दिल्ली: दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मेटा (Meta) पुन्हा एकदा नोकर कपातीच्या (Layoff) तयारीत आहे. मेटा, फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (Whatsapp) आणि इंस्टाग्रामचे (instagram) मूळ मालक, पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेटा कंपनी लवकरच हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. याआधीही कंपनीने १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
आता पुन्हा एकदा मेटा कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याने हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ने ११,००० कर्मचार्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर आता कंपनीने दुसऱ्या फेरीच्या टाळेबंदीची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, ‘मेटा’ने अनेक टीमच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
[read_also content=”चार वर्षांपासून होते संबंध, आले संपुष्टात, प्रियकराला झाला राग अनावर; बदला घेण्यासाठी उचललं असं पाऊल की… https://www.navarashtra.com/crime/delhi-cyber-crime-news-man-arrested-for-creating-fake-instagram-account-in-girlfriends-name-nrvb-374414.html”]
‘मेटा’ सोबतच, अमेझॉन (Amazon), गुगल (Google) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या टेक दिग्गजांनीही सध्याच्या आर्थिक मंदीमुळे (Economic Downturn) मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कपातीची घोषणा केली आहे. दरम्यान, मेटाने २०२२ च्या अखेरीस ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनीने १३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. जागतिक मंदीची भीती आणि कंपनीच्या उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन कंपनीने नोकऱ्या कपातीचे कारण दिले होते. टेक कंपन्यांमध्ये मेटा कंपनीने ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता.






