फॅशन ब्रँड पर्पल युनायटेडचा आयपीओ 11 डिसेंबरला उघडणार; वाचा... कितीये किंमत पट्टा!
स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने सोमवारी (6 जानेवारी 2025) समभाग विक्रीची खुली आयपीओ ऑफर सुरु करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी (8 जानेवारी 2025) रोजी ही खुली ऑफर गुंतवणुकीसाठी बंद होईल. कंपनीने या आयपीओ ऑफरमध्ये प्रति समभाग किंमत पट्टा 133 रुपये ते 140 रुपये इतका निश्चित केला आहे. कंपनीच्या या आयपीओ दरम्यान विक्रिस असलेल्या प्रत्येक समभागाची दर्शनी किंमत ही 10 रुपये ठेवण्यात आली आहे.
इच्छुक गुंतवणूकदार किमान 107 समभागाच्या एका लॉटसाठी, त्यापुढे 107 समभागांच्या पटीत शेअर खरेदीसाठी बीड करु शकतील. स्टँडर्ड ग्लास लायनिंग कंपनीचा हा पहिलाच आयपीओ आहे. आयपीओमध्ये फ्रेश म्हणजे नवे शेअर व कंपनी प्रमोटर समुहाद्वारा विक्रीस काढण्यात आलेल्या ऑफर ऑफ सेल समभागांचा समावेश आहे. त्यानुसार फ्रेश इश्यू अंतर्गत 210 कोटींचे शेअर तर ऑफर ऑफ सेल अंतर्गत 1,42,89,367 समभाग विक्रीस उपलब्ध आहेत.
कंपनी फ्रेश इश्यूमधून उभ्या होणाऱ्या भांडवलातून 10 कोटी रुपये मशिनरी व उपकरण खरेदीच्या माध्यमातून भांडवली खर्चासाठी वापरणार आहे. तसेच 130 कोटी हे कंपनीवरील कर्जे पूर्णत वा अंशता फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. कंपनीने आपल्या मटेरियल उपकंपनी अर्थात एसटू इंजिनिअरींग इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणुकीसाठी ही कर्जे घेतली हीती. तसेच स्टँडर्ड ग्लास लायनिंग कंपनी आपल्या या उपकंपनीत आणखी 30 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. उपकंपनीतील ही गुंतवणूक मशिनरी व उपकरण या भांडवली खर्चासाठीच वापरण्यात येणार आहे. तसेच 20 कोटी रुपये अन्य कंपन्या ताब्यात घेऊन कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि अन्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहेत.
उद्यापासून देशातील सर्व बॅंकांची खाती बंद होणार; आरबीआयने घेतला मोठा निर्णय
स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी औषधनिर्माण उद्योगातील कंपन्यांना आवश्यक उत्पादने पुरवण्यात देशात आघाडीवर आहे. डिझायनिंग, इंजिनिअरींग, मॅन्युफॅक्चरींग, असेम्ब्ली, इंस्टॉलेशन, तसेच कमिशन या साठी आवश्यक उत्पादनांचा पुरवठा स्टँडर्ड ग्लास लायनिंग कंपनीकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. कंपनीच्या उत्पादन यादीत रिॲक्शन सिस्टिम्स, स्टोरेज, सेपरेशन, व ड्राइंग सिस्टिम्स या प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे.
ही उत्पादने फार्मास्युटिकल्स कंपन्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत. तसेच स्टँडर्ड ग्लास लायनिंग ही कंपनी ग्लास लाईनल, स्टेनलेस स्टील व निकेल मिश्रधातुची अभियांत्रिकी उत्पादने पुरवण्यात देशात आघाडीवर आहे. वित्तीय वर्ष 2024च्या महसुलानुसार एफ अँड एस अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. याच वित्तीय वर्षातील महसुलानुसार पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिलीन (पीटीएफई) लाईन्ड पाईपलाईन व फिटींग्स पुरवण्यात देखील देशभरात ही कंपनी आघाडीवर आहे. यामुळे गेल्या तीन वित्तीय वर्षात ही कंपनी उद्योगातील सर्वाधिक वेगाने विकास साधणारी कंपनी ठरली आहे.
कंपनीकडून पुरवठा केली जाणारी सर्व उत्पादने व सिस्टिम्स स्वत: निर्माण करण्याची क्षमता कंपनीकडे असून कंपनीच्या कारखान्यातच त्यांची निर्मिती केली जाते. विशेषत: फार्मा कंपन्यांना एपीआय निर्मितीसाठी लागणारी उपकरणे पुरवण्यात ही कंपनी माहीर आहे. गेल्या दशकभरात कंपनपीने तब्बल 11,000 उत्पादनांचा पुरवठा केला आहे. कंपनीच्या प्रमुख 80 ग्राहकांमध्ये 30 फार्मास्युटिकल्स कंपन्यांचा समावेश आहे.
30 जून 2024 च्या माहितीनुसार या सर्व कंपन्यांचा राष्ट्रीय शेअर बाजारातील म्हणजेच एनएसईमधील पहिल्या 500 कंपन्यांमध्ये समावेश आहे. स्टँडर्ड ग्लास लायनिंग कंपनीचे प्रचालन तब्बल आठ कारखानातून चालते. या कंपन्या हैदराबाद शहरातील मोक्याच्या ठिकाणी तब्बल 400,000 चौरस फूट क्षेत्रफळावर वसवण्यात आल्या आहेत. तेलंगणातील हैदराबाद शहराला देशाचे औषधनिर्मितीचे प्रमुख केंद्र म्हटले जाते. कारण देशातील 40 टक्के औषध निर्मिती याच शहरातून केली जात असल्याचे 2024 वित्तीय वर्षात उघडकीस आले आहे.