Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार हिंदुस्तान झिंक, आयआरईडीए, बजाज फायनान्स, एल अँड टी टेक्नॉलॉजी, युनियन बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, वेदांत, ऑइल इंडिया लिमिटेड, आयडीबीआय बँक, इक्सिगो, झेन टेक्नॉलॉजीज या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी कोफोर्ज, ललिता ज्वेलरी मार्ट आणि टायटन या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील इक्विटी रिसर्चचे एव्हीपी, गणेश डोंगरे यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी लार्सन अँड टुब्रो, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि बजाज फायनान्स या तीन शेअर्सची निवड केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे चंदन तापारिया गुंतवणूकदारांसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये म्फासिस, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि इंडियन हॉटेल्स कंपनी यांचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन शेअर्सची निवड केली आहे. ज्यामध्ये आयआरएफसी, मदरसन सुमी वायरिंग इंडिया आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स या स्टॉक्सचा समावेश आहे. तसेच, सुमीत बागडिया यांनी आज खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि ग्रासिम इंडस्ट्रीज या तीन शेअर्सची देखील शिफारस केली आहे. आनंद राठीचे मेहुल कोठारी यांनी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, युको बँक आणि सुझलॉन एनर्जी या तीन शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.






