Share Market Today: रक्षाबंधनाला शेअर बाजार सुरूच; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याने गाठला 1.63 लाख रुपयांचा टप्पा, चांदीचा भाव 2.59 लाखांवर!
मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ५३९.३५ अंकांनी, म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून ७६,९३३.५९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ११६.९० अंकांनी, म्हणजेच ०.४८ टक्क्यांनी घसरून २४,०९०.८५ अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य: Pinterest)
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये जिंदाल सॉ लिमिटेड, साई लाईफ सायन्सेस लिमिटेड, ब्लू स्टार लिमिटेड, ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, एथर एनर्जी लिमिटेड, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड, आणि श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवूकदार खरेदी आणि विक्री करण्यासाठी पाइन लॅब्स, अदानी एंटरप्रायझेस आणि एनसीसी या तीन शेअर्सची निवड करू शकतात. रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी आज गुंतवणूकदारांना सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सवर फोकस करण्याचा सल्ला दिला आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज आणि टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, लॉरस लॅब्ज आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) या शेअर्सची निवड केली आहे.






