अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा
राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) शनिवार, दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी खुला राहणार आहेत. या दिवशी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बीएसई आणि एनएसई या दिवशी व्यवहार करणार आहेत. गुंतवणूकदारांना या शनिवारी व्यवहार करता येणार आहेत. शेअर बाजारातील व्यवहार सकाळी 9.15 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत होतील. असे शेअर बाजाराकडून सांगण्यात आले आहे.
शनिवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ
शनिवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1 फेब्रुवारी 2020 आणि 28 फेब्रुवारी 2015 रोजी अर्थसंकल्प देखील शनिवारी सादर करण्यात आला होता. आणि त्या दिवशी शेअर बाजार खुला होता. यावेळीही शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. गुंतवणूकदारांसाठी अर्थसंकल्पाच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शेअर बाजारात चढ-उतार होतात. कारण सरकारी योजना, खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित घोषणांचा थेट परिणाम बाजारावर होतो. अनेक गुंतवणूकदार या दिवशी नफा मिळविण्यासाठी धोरणे आखतात.
इंडिगोकडून प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; आता बसच्या तिकिटामध्ये जाता येणार परदेशात!
सरकारच्या खर्चाची, महसूलाची रूपरेषा समजते
1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणारा हा अर्थसंकल्प 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या खर्चाची आणि महसूलाची रूपरेषा दर्शवतो. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल, ज्यामध्ये सरकार नवीन योजना, धोरणे आणि कर सुधारणांची घोषणा करू शकते. त्यामुळे या दिवशी शेअर बाजारात मोठे उलटफेर पाहायला मिळणार आहेत.
आता 10 मिनिटांत किराणा घरपोच मिळणार; झेप्टो, ब्लिंकिट, फ्लिपकार्टला टक्कर देणार ‘ही’ कंपनी
गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक पाऊल
हा अर्थसंकल्प सादर करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. अर्थसंकल्पाच्या दिवशी सर्वसामान्य जनता आणि गुंतवणूकदारांना सरकारकडून अनेक नवीन घोषणा आणि दिलासा अपेक्षित असतो. दरम्यान, आता शनिवारी शेअर बाजार खुला ठेवणे हे गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)