Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज
Todays Gold-Silver Price: सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरातील भाव वाचा एका क्लिकवर
गुरुवारी, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांमध्ये मोठी आणि व्यापक घसरण झाली. सेन्सेक्सने चार महिन्यांहून अधिक काळातील सर्वात मोठी एका दिवसाची घसरण नोंदवली, तर निफ्टी ५० २५,९०० च्या पातळीच्या खाली घसरला. विक्रीच्या तीव्र दबावामुळे ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७८० अंकांनी म्हणजेच ०.९२% ने घसरून ८४,१८०.९६ वर स्थिरावला. कॅपिटल मार्केटच्या आकडेवारीनुसार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी निर्देशांक १.०४% घसरल्यानंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. या स्टॉक्समध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक, सीजी पॉवर आणि डेटा पॅटर्न यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. या स्टॉक्समध्ये आयनॉक्स इंडिया, रॅम्को सिमेंट्स लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया, शोभा आणि वनसोर्स स्पेशालिटी फार्मा यांचा समावेश आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी दोन स्टॉक्सची तर आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आज खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफरास केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान तीन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या स्टॉक्समध्ये एआयए इंजिनिअरिंग, इंडिया सिमेंट्स, डॉ. रेड्डीज लॅब, इन्फोसिस, केफिन टेक्नॉलॉजीज, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर आणि झेन्सार टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.






