'या' चार देशांमध्ये भारतापेक्षा अधिक लोकप्रिय आहे ट्रेन; अर्ध्याहून अधिक लोकसंख्या करते प्रवास!
रेल्वेला भारताची जीवनवाहिनी म्हटले जाते. देशात दररोज 13,000 हून अधिक ट्रेन धावतात आणि 2.4 कोटी लोक प्रवास करतात. पण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिल्यास जगातील चार देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या भारतापेक्षा अधिक आहे. आकडेवारीनुसार, भारतात ५३ टक्के लोक लोकल रेल्वेने प्रवास करतात. या यादीत युरोपीय देश असलेला स्वित्झर्लंड अव्वल आहे. या देशातील ६७ टक्के लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. ही संख्या यूकेमध्ये 56 टक्के, सिंगापूरमध्ये 56 टक्के आणि जर्मनीमध्ये 56 टक्के आहे. याचा अर्थ या देशांमध्ये लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. हा आकडा गेल्या वर्षी लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आहे.
हे देखील वाचा – ‘ही’ आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की; किंमत वाचून चाट पडाल…!
या देशांमध्ये होतो ट्रेनचा सर्वाधिक वापर
रेल्वेची सुरुवात युरोपमध्ये झाली आणि आजही त्या ठिकाणी रेल्वे सर्वात लोकप्रिय वाहतुकीचे साधन आहे. स्वित्झर्लंड, यूके, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, स्वीडन आणि झेक रिपब्लिकमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोक स्थानिक रेल्वेचा वापर करतात. पण फ्रान्स, मोरोक्को आणि चीनसारख्या देशांमध्ये हायस्पीड ट्रेन असूनही फार कमी लोकांना रेल्वेने प्रवास करायला आवडते. चीनमधील हाय-स्पीड नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. अमेरिकेत केवळ १५ टक्के लोक रेल्वेने प्रवास करतात. तर ब्राझीलमध्ये हे प्रमाण १७ टक्के, मेक्सिकोमध्ये १३ टक्के आणि कोलंबियामध्ये ८ टक्के आहे.
सिंगापूरमध्ये सर्वाधिक लोक करतात ट्रेनने प्रवास
आशियाबद्दल बोलायचे झाले तर, या ठिकाणी सिंगापूरमध्ये सर्वाधिक 56 टक्के लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. सिंगापूर हा एक छोटासा देश आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतातील ५३ टक्के लोक रेल्वेने प्रवास करतात. देशात दररोज 13,000 हून अधिक ट्रेन धावतात आणि सुमारे 2.4 कोटी लोक प्रवास करतात. देशातील अनेक शहरांमध्ये आता मेट्रो ट्रेन सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे तैवानमधील 50 टक्के लोकांची आणि जपानमधील 47 टक्के लोकांची रेल्वे ही आवडती वाहतूक आहे. ऑस्ट्रेलियातील ४९ टक्के लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.