मासेपालन व्यवसायातून महिलेने साधली आर्थिक प्रगती; करतीये वर्षाला 45 लाखांची कमाई!
सध्याच्या घडीला सर्वच क्षेञांमध्ये महिला स्वतला सिद्ध करत आहे. त्या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेञात खांद्याला खांदा लावून काम करत आहे. अनेक महिला या सध्या नोकरीच्या मागे न लागता, शेती किंवा शेतीआधारित उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका महिला व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या मासेपालन व्यवसायातून वर्षाला तब्बल ४५ लाखांची कमाई करत आहे.
तरुणपणातच पतीचे निधन
सुबुही नाज असे या महिला व्यावसायिकाचे नाव असून, त्या उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी आहेत. सुबुही नाज यांचे पती लग्नाच्या अवघ्या तीन वर्षातनंतरच १९९७ साली मृत्यू पावले. ज्यामुळे नाज यांना मुलाच्या पालनपोषणासह स्वतचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. असे असूनही त्यांनी पतीच्या निधनाचे दुख सावरत, मुलाच्या पालनपोषणासाठी १९९८ साली वाराणसी येथे कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यावर त्यांनी मुलाला उच्च शिक्षण दिले.
हेही वाचा – निर्मला सीतारामन यांचा 65 वा वाढदिवस, …कार्यकाळात घेतलेत ‘हे’ धडाकेबाज आर्थिक निर्णय!
४८ व्या वर्षी मत्यपालन व्यवसायात उतरण्याचा निर्णय
सुबुही नाज यांचा मुलगा अब्दुल याने देखील आईच्या कष्टांचे चीज करत, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (बीएचयू) मधून कला शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. त्याने पदवीनंतर मत्स्य विज्ञान विषयातून पदवी संपादन केली. कोलकाता येथील आयसीआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुबुही सांगतात, ‘एक दिवस अब्दुलने मला फोन केला आणि मत्स्यपालन व्यवसायाबाबत सांगितले. त्यानंतर आपण वयाच्या ४८ व्या वर्षी मत्यपालन व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी पुरस्कार 2024 ने सन्मानित
विशेष म्हणजे त्यांना मत्सपालन व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेद्वारे अनुदान देखील मिळाले. ज्यामुळे त्यांना ३० लाख अनुदान देखील मिळाले आहे. या आर्थिक मदतीच्या आधारे त्यांनी आपला मत्स प्लॉंट उभारला. विशेष म्हणजे मागील दोन ते तीन वर्षात अर्थात 2022 ते 2024 या काळात त्यांनी 83.6 टन माशांचे उत्पादन घेतले. त्यांच्या या अधिकच्या उत्पादनामुळे त्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय मत्स्य शेतकरी पुरस्कार 2024 ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
किती मिळतंय उत्पादन?
सुबुही नाज सांगतात, आपल्याला व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेचच यश मिळाले नाही. मत्सपालन व्यवसायात यश मिळण्यासाठी आपल्याला मोठी वाट पाहावी लागली. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 30.2 टन आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये 36.4 टन माशांचे उत्पादन मिळाले. त्यांनी मासेपालन व्यवसायासाठी तलाव उभारले असून, त्यात त्या ग्रास कार्प, मृगल कार्प, कातला, रोहू अशा माशांचे पालन करत आहे.