फोटो सौजन्य - Social Media
कोलकात्याच्या नंदन मल यांनी केवळ २४ व्या वर्षी व्यवसाय सुरू करत यशाची मोठी झेप घेतली आहे. २०१४ मध्ये त्यांनी हुलाडेक रीसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही ई-कचरा प्रक्रिया करणारी कंपनी सुरू केली. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना उद्योजकतेची आवड निर्माण झाली. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालेल्या ‘मेक युवर बिझनेस प्लॅन’ या स्पर्धेत त्यांनी ई-कचऱ्यावर आधारित कल्पना सादर केली आणि ती जिंकली. यामुळे त्यांना ‘ई-पेरिसारा’ या कोलकात्यातील सुरुवातीच्या ई-कचरा प्रक्रियाकेंद्रात इंटर्नशिपची संधी मिळाली.
नंदन मल यांनी आपल्या वडिलांकडून आणि स्वतःच्या बचतीतून १० लाख रुपये गोळा करून केवळ २०० चौरस फूट जागेत व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा टर्नओव्हर ७.५ कोटी रुपये असून कंपनीत ८० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. सुरुवातीला त्यांनी नियमित कर्मचारी न ठेवता कॉलेजच्या इंटर्नना प्रशिक्षण देऊन काम दिलं. हे इंटर्न घर, ऑफिस, हॉस्पिटल, हॉटेल अशा ठिकाणांहून ई-कचरा जमा करत.
हुलाडेक कंपनी सध्या दरवर्षी ४,००० टनांहून अधिक ई-कचऱ्याचे संकलन आणि प्रक्रिया करते. सुरुवातीला केवळ ३५ टन कचरा जमा झाला होता. नंदन मल यांची कंपनी काच, प्लास्टिक, फेरस व नॉन-फेरस धातू अशा चार प्रकारांमध्ये कचरा वर्गीकृत करते आणि त्याची प्रक्रिया करते.
कंपनीचे कचरा संकलनाचे चार प्रमुख मार्ग आहेत:
आज या कंपनीच्या बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर, असम आणि महाराष्ट्रात १८ फ्रेंचायझी आहेत. कंपनी रोज सुमारे १० टन कचरा जमा करते आणि २,००० हून अधिक ग्राहकांना सेवा देते, त्यापैकी २५० ग्राहक ‘एक्सक्लुझिव्ह’ आहेत, ज्यात रेड बुल, इन्फोसिस, विप्रो, कॅडबरी, हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा समावेश आहे. नंदन मल यांची ही यशोगाथा तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरते, जिथे एक साधी कल्पना देखील मोठं यश मिळवू शकते.