फोटो सौजन्य - Social Media
पु.ना. गाडगीळ देशातील अग्रेसर ज्वेलर्सपैकी एक आहे. व्यापार क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशामध्ये पोहचवण्यात या मराठी माणसाच्या कंपनीचा नाव अग्रेसर आहे. मराठी माणूस फक्त खेळ आणि कला क्षेत्रच नव्हे तर व्यापार क्षेत्रातही फार मोठी भरारी घेवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये या IPO ची शानदार लिस्टिंग झाली होती. गेल्या महिन्यातील यश प्राप्त केलेल्या IPO मध्ये पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या IPO चे नाव आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनीला फार फायदा झाला होता. पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सौरभ गाडगीळ यांच्या संपत्तीत या IPO मुळे १.१ बिलियनची वाढ झाली होती.
हे देखील वाचा : शेअर बाजारातही चीन ठरतोय भारताला डोकेदुखी ? जाणून घ्या भारतीय शेअर बाजार घसरणीचे नेमके कारण
सौरांभ गाडगीळ या गाडगीळ ज्वेलर्स साम्राज्याचे आताचे वासरदार आहे. दशकभरा पूर्वी या सुवर्ण साम्राज्याची दोर त्यांच्या हातात आली. ४७ वर्षीय सौरभ गाडगीळ यांनी पुण्यातच आपले MBA पूर्ण केले आहे. कंपनीची दोर हाती येताच त्यांनी राज्यभर कंपनीला वाढवून तिला देशभरात नवीन दिशा देण्याचा अनिर्धार केला होता. मुळात, हा निर्धार त्यांनी पूर्णत्वास आणला असून पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स आज महाराष्ट्रभरात तर आहेच, त्याचबरोबर इतर राज्यांमध्येही तनिष्क, आदित्य बिर्ला समूह तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या कंपनींना टक्कर देत आहे. विविध ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार दागिने बनवून देण्यात पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स नामवंत आहे.
१८३२ साली, गणेश नारायण गाडगीळ यांनी या पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सला सुरुवात केली होती. त्याकाळी ते सांगलीच्या बाजारपेठेत फुटपाथच्या शेजारी बसून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करायचे. आज या सुवर्ण साम्राज्याचे वैभवग इतके विशाल आहे कि आजच्या घडीला पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे ब्रँड एम्बसीडर सलमान खान, माधुरी दीक्षित तसेच रविना टंडन आहे. पीएन गाडगिलचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर त्याच्या इश्यू प्राइसपेक्षा 65 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बीएसईवर (BSE) पीएन गाडगिलचा शेअर 73.75 टक्क्यांच्या वाढीसह 834 रुपयांवर सूचीबद्ध झाला, आणि नंतर 75.79 टक्क्यांनी वाढत 843.80 रुपयांवर पोहोचला. शेवटी, हा शेअर 65.16 टक्क्यांच्या वाढीसह 792.80 रुपयांवर बंद झाला. एनएसईवर (NSE) कंपनीच्या शेअरने 72.91 टक्क्यांनी वाढत 830 रुपयांवर लिस्टिंग घेतली आणि दिवसाचा शेवट 64.14 टक्क्यांच्या वाढीसह 787.90 रुपयांवर झाला.
हे देखील वाचा : Rama Murthy Thyagarajan : अब्जाधीश असूनही राहतात अलिशान जीवनशैलीपासून लांब; त्यांचा साधेपणा, त्यांची खरी ओळख
पीएन गाडगिलच्या आयपीओला शेवटच्या दिवशी 59.41 पट सब्सक्रिप्शन मिळाले होते. कंपनीच्या 1,100 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्रति शेअर 456-480 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. या इश्यूमधून मिळालेल्या रकमेतून कंपनी 393 कोटी रुपये महाराष्ट्रात 12 नवीन दुकानं उघडण्यासाठी वापरणार आहे. तसेच, 300 कोटी रुपयांचा वापर कंपनी कर्जफेडीसाठी करणार असून उर्वरित रक्कम सामान्य कंपनी कामांसाठी वापरली जाणार आहे.