भारत सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U 2.0) चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे आहे. हा उपक्रम 9 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या उपक्रमामध्ये 1 सप्टेंबर 2024 पासून पुढील पाच वर्षात 1 लाख घरे बांधण्याच्या योजनेसह नवीन घरांकरिता 2.50 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाते. या अनुदाना मुळे शहरी भागात राहणाऱ्या आणि घर घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सहाय्य होते. जाणून घेऊया या योजनेसंबंधी महत्वाची माहिती
योजनेची पात्रता:
या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी पात्रता दिली गेली आहे, यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) ,अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) विभागातील कुटुंबांचा समावेश होतो. या व्यक्तींकडे देशात कुठेही कायमस्वरुपी घर नसायला हवे. EWS साठी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपर्यंत आहे, LIG करिता कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये आहे, तर MIG कुटुंबांकरिता उत्पन्न निकष 6 लाख ते 9 लाख रुपये आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
ही कागदपत्रे अर्जदारासाठी आवश्यक आहेत जी त्यांना सादर केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि अर्ज प्रक्रियेतील डुप्लिकेशन आणि फसवणूक रोखली जाते.
PMAY-U 2.0 साठी अर्ज कसा करावा?
PMAY-U 2.0 या योजने अंतर्गत 1 कोटी नवीन कुटुंबांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याकरिता
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम या योजनेच्या वेबसाइटवर जावे.
आता PMAY-U 2.0 साठी अर्ज करा वर क्लिक करा.
त्यानंतर पूर्ण तपशील भरा आणि सबमिट करा.
जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुम्हाला इथे थांबवले जाईल.
पात्र असल्यास, पुढील प्रक्रियेत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा .
यानंतर तुम्हाला जनरेट OTP वर जावे लागेल.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
जो भरल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता.
हे लक्षात ठेवा
ज्या लोकांनी मागील 20 वर्षामध्ये कोणत्याही केंद्र, राज्य अथवा स्थानिक सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतला असेल तर ते PMAY-U 2.0 साठी पात्र असणार नाहीत.
प्रधानमंत्री आवास योजना ही नवीन लाभार्थ्यांना लाभ मिळावेत यासाठी सुरु केली गेली आहे. ज्यामुळे नवीन लोकांना त घर घेताना सहाय्य मिळू शकते.