टायर कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत नफा घटला; भागधारकांसाठी लाभांशही जाहीर, 'ही' आहे रेकाॅर्ड तारीख!
टायर कंपनी एमआरएफसाठी सप्टेंबर तिमाही संमिश्र होती. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत एमआरएफचा निव्वळ नफा कमी झाला. परंतु महसूल वाढला. कंपनीचे तिमाही निकाल आश्चर्यकारक नव्हते आणि अपेक्षेप्रमाणे होते. कंपनीने तिमाही निकालासह आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. एमआरएफने भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे.
हे देखील वाचा – गारमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला; केवळ 20-24 रुपयांमध्ये लावता येईल बोली!
महसूल 6760 कोटी रुपयांवर
सप्टेंबर तिमाहीत एमआरएफचा निव्वळ नफा वार्षिक 20.4 टक्क्यांनी घसरून, 455 कोटी रुपयांवर आला आहे. मात्र, ही घसरण असूनही तो अजूनही विश्लेषकांच्या सरासरी 434 कोटी रुपयांच्या नफ्याच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. या कालावधीत एमआरएफचा महसूल 11.1 टक्क्यांनी वाढून, 6760 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो 6850 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा कमी होता.
(फोटो सौजन्य – istock)
या कालावधीत EBITDA 14 टक्क्यांनी घसरून 973.6 कोटी रुपयांवर आला, जो 960 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा किंचित जास्त होता. या कालावधीत मार्जिन 4 टक्क्यांहून अधिक घसरून 14.4 टक्क्यांवर आले.
तिमाही निकालासह, एमआरएफने प्रति शेअर 3 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. त्याची रेकॉर्ड तारीखही निश्चित करण्यात आली असून, ती 19 नोव्हेंबर 2024 आहे. लाभांश 29 नोव्हेंबरपर्यंत भागधारकांच्या खात्यात जमा केला जाईल.
हे देखील वाचा – पुढील आठवड्यात खुला होणार ‘हा’ जबरदस्त आयपीओ; वाचा किंमत पट्टा… सर्व डिटेल्स!
शेअर्स घसरले
या कमकुवत निकालाचा शेअर्सवर मोठा परिणाम झाला. शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले. एमआरएफ शेअर्सची सध्या बीएसईवर किंमत 1,18,153.40 रुपये आहे. इंट्रा डेमध्ये शेअर्स 2.86 टक्क्यांनी घसरून 1,17,500.00 रुपयांवर आला. कंपनीचे शेअर्स 1,51,445 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून 22 टक्क्यांनी खाली आले आहेत.झाला. शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले. एमआरएफ शेअर्सची सध्या बीएसईवर किंमत 1,18,153.40 रुपये आहे. इंट्रा डेमध्ये शेअर्स 2.86 टक्क्यांनी घसरून 1,17,500.00 रुपयांवर आला. कंपनीचे शेअर्स 1,51,445 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून 22 टक्क्यांनी खाली आले आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)