Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च

Vasai News : वसई-विरार शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शिल्पे, कारंजी आणि सौंदर्यस्थळे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कचरा आणि झुडपांमध्ये अडकली आहेत. शहराच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, महापालिकेने यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पुन्हा ३ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 04, 2026 | 11:30 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लाखो रुपयांचा झाला चुराडा
  • कोट्यवधींची शिल्पे कचऱ्यात
  • देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च!
Vasai News : वसई-विरार शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शिल्पे, कारंजी आणि सौंदर्यस्थळे आज अक्षरशः दुर्लक्षाची शिकार ठरली आहेत. एकेकाळी शहराची ओळख ठरलेली ही शिल्पे आता कचऱ्याचे ढीग, वाढलेले गवत, बंद पडलेली कारंजी आणि नादुरुस्त प्रकाशयोजना यामुळे विद्रूप झाली असून, शहराच्या सौंदर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता त्यांच्याच देखभाल-दुरुस्तीसाठी पुन्हा तीन कोटी रुपयांचा खर्च करण्याच्या प्रस्ताव महापालिकेत संमत करण्यात आला आहे.

मोठी बातमी ! EPFO ने जुना नियम बदलला; आता 25 हजारापर्यंतच्या मूळ वेतनावर मिळणार पेन्शन?

राज्य शासनाच्या शहर सौंदर्याकरण उपक्रमांतर्गत वसई-विरार व महापालिकेच्या निधीतून शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी ६० शिल्पे, कारंजी आणि सौंदर्यस्थळे उभारण्यात आली होती. मात्र, नियमित देखभाल आणि निगा न राखल्याने अनेक ठिकाणी शिल्पांच्या परिसरात गवत आणि काटेरी झुडपे वाढली आहेत.

खासगी व्यक्तींसह राजकीय पक्षांचे बॅनर

काही शिल्पांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, अस्वच्छता पसरली आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या निधीतून उभारलेल्या शिल्पांवर खासगी व्यक्ती, राजकीय पक्षांचे बॅनर लावले जात आहेत. परिणामी सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या प्रकल्पांच्या देखभालीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रकाणयंत्रणा बंद पडल्याने सौंदर्यस्थळे अंधारात

कारंज्यांमध्ये पाणी नसून ती अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. रात्री शहराची शोभा वाढवण्यासाठी बसवण्यात आलेली फ्लड लाईट आणि अन्य प्रकाशयंत्रणाही अनेक ठिकाणी बंद पडल्याने सौदर्यस्थळे अंधारात हरवली आहेत. शिल्पांच्या देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी कचरा साचला असून, कारंजी बंद पडली आहेत, तर प्रकाशयोजनाही नादुरुस्त झाल्याची बाब लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. महासभेत विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी ‘फ्लड लाईट ‘व्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक ठिकाणी दिवे बंद असतानाही देखभालीसाठी मोठा निधी खर्च केला जात असल्याचा आरोप केला. स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत सौंदर्यस्थळांवर कचरा साचणे, दिवे बंद राहणे किंवा कारंजी नादुरुस्त असणे यासाठी प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधींनी तक्रार करण्याची वेळ येता कामा नये. प्रशासनाने स्वतःहून नियमित पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित आहे, असेही सुनावले.

महासभेत खर्चाच्या प्रस्तावावर नाराजी

दरम्यान, या पार्श्वभूमीवर महापालिकेने २०२६-२७ते २०२८-२९ या तीन वर्षांसाठी शिल्पे, कारंजी आणि सौदर्यस्थळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापूर्वीच्या देखभालीत झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, नवीन निधी खर्च करण्यापूर्वी विद्यमान सौंदर्यस्थळे पूर्ववत करण्याला प्राधान्य देण्याऐवजी त्याच्याच देखभाल-दुरुस्तीसाठी पुन्हा खर्च करण्याच्या प्रस्तावावर महासभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली..

नियमित देखभाल, जबाबदारी निश्चित करा

शहरातील अनेक सौदर्यस्थळे आज ओसाड आणि दुर्लक्षित दिसत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कशासाठी झाला, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहराचे सौंदर्य वाढवण्याच्या उद्देशाने उभारलेली शिल्पेच आज दुर्लक्षामुळे विद्रूप झाल्याने त्यांची नियमित देखभाल आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जात आहे.

Liquor Ban: दारु मिळणारच नाही… Old Monk सह ‘या’ ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी! प्रशासनाने अचानक का घेतला निर्णय?

Web Title: Vasai news beautification sculptures neglect vvmc approves 3 crore for maintenance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • cleaning tips
  • Government
  • Marathi News
  • palghar
  • Vasai news

संबंधित बातम्या

Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे ‘या’ ४ राशींना मिळणार भरघोस लाभ, कोणत्या राशी जाणून घ्या….
1

Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे ‘या’ ४ राशींना मिळणार भरघोस लाभ, कोणत्या राशी जाणून घ्या….

PMC News: न्यायालयाचे आदेश अन् बेलीफ पालिकेत! पुणे पालिका आयुक्तांची खुर्ची जाता जाता राहिली
2

PMC News: न्यायालयाचे आदेश अन् बेलीफ पालिकेत! पुणे पालिका आयुक्तांची खुर्ची जाता जाता राहिली

Entertainment News: इच्छा कलशातून रुजली भक्तीची हिरवाई! आषाढी एकादशीला श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम
3

Entertainment News: इच्छा कलशातून रुजली भक्तीची हिरवाई! आषाढी एकादशीला श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम

British Lion Beer In India: ब्रिटनची प्रसिद्ध ‘लायन बीअर’ 60 वर्षांनंतर भारतात! दिल्लीत होणार लाँच; काय आहे किंमत?
4

British Lion Beer In India: ब्रिटनची प्रसिद्ध ‘लायन बीअर’ 60 वर्षांनंतर भारतात! दिल्लीत होणार लाँच; काय आहे किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.