'या' देशात आहे तब्बल 10 लाखांची नोट; भारतीय रुपयात तिचे मूल्य माहितीये? वाचून अवाक व्हाल!
तुम्हाला सांगितले की जगाच्या पाठीवर एक असा देश आहे. ज्या ठिकाणी चलनात तब्बल १० लाख रुपयांची नोट वापरात आहे. तर आपल्यापैकी बरेच जण अचंबित झाल्याशिवाय राहणार आहे. मात्र, प्रत्येक देशाचे आपले एक विशिष्ट चलन असते. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या देशात जायचे असेल तर आपल्याला तिथल्या चलनानुसार आपल्या देशातील चलनातून एक्सचेंज करावे लागते. मग आपल्याला तेथील सर्व सुविधांचा, वस्तू आणि सेवांचा चांगला फायदा घेता येतो. मात्र, आता एक देश असा आहे ज्या ठिकाणी १० लाखाची नोट चलनात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत…
काय आहे या देशाचे नाव?
हा देश आहे व्हेनेझुएला. या देशात तब्बल 10 लाख इतकी मूल्य असलेली नोट आहे. सर्वात जास्त चलनाची किंमत असलेला हा जगातला एकमेव देश ठरला आहे. परंतु, इतर देशांच्या मानाने ही किंमत फारच कमी ठरते. ही रक्कम अतिशय कमी आहे. म्हणजे 10 लाख बोलिव्हरची किंमत ही अमेरिकन डॉलरमध्ये सुमारे 0.50 तर भारतीय रूपयांमध्ये 30 रूपये इतकी आहे.
(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
का वाढलीये इतकी किंमत?
या नोटेची किंमत वाढण्यामागील कारण म्हणजे येथील बदलली परिस्थिती. एकेकाळी हा देश अत्यंत श्रीमंत असा देश होता. परंतु येथील नागरिकांना गरीबीचा समाना करावा लागतो आहे. त्यामुळे नोटांच्या किंमती या वाढल्या आहेत. 10 हजार, 20 हजार आणि 50 हजाराच्याही नोटा या देशात आहेत. व्हेनेझुएलामध्ये 1 भारतीय रूपयाचे मूल्य 25584.66 बोलिव्हर इतके आहे.
10 लाखाची नोट ऑक्टोबर 2021 जारी
जगात असे अनेक देश आहेत. जे सध्या विविध आर्थिक विवंचनेतून जात आहे. त्यातून यांच्या चलनाची किंमतही प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे येथेही स्वस्तात फिरण्यासाठी लोकं गर्दी करताना दिसतात. ऑक्टोबर 2021 साली या देशाने 10 लाखाची नोट जारी केली आहे. येथे तुम्हाला फिरायला येयाचे असेल तर तुम्हाला हे अगदीच स्वस्त पडेल.
भारतीयांसाठी नेपाळ, भूटान, व्हिएतनाम, हाँगकाँग, मकाऊ, दुबई हे काही स्वस्त देश आहेत. जिथे फिरायला जाऊ शकतात. त्यातून अमेरिका, कॅनडा, लंडन असे देश हे त्यामानाने महाग ठरतात. या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक पर्यटक हे गर्दी करताना दिसतात. त्यातून येथील व्हिसाही प्रचंड डिमांडिंग आहे. शिक्षणासाठी, नोकरीसाठी लोक येथे चांगलीच गर्दी करतात.