व्होडाफोन आयडियाने लाँच केले Vi Finance; कर्ज, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड्ससह मिळतील 'या' सुविधा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Vi Finance Marathi News: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी (वोडाफोन आयडिया) ने वी फायनान्स हा एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म वी ऍपवर सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना कर्ज, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि क्रेडिट कार्ड्स या सुविधा सहजपणे मिळवण्यात मदत करण्यासाठी वी ने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
त्यामुळे आता वी ऍपवरील उपयुक्त वैशिष्ट्ये आणि क्षमता अजून जास्त वाढल्या आहेत. विविध सेवासुविधांची पेमेंट्स, मुव्हीज आणि टीव्ही शो, गेमिंग, ई-कॉमर्सवर खरेदीमध्ये सूट, क्विक कॉमर्स आणि इतर अनेक वेगवेगळ्या सेवा वी ऍपवर आधीपासून उपलब्ध आहेत.
AI मध्ये 2030 पर्यंत १०.३५ दशलक्ष नोकरीची संधी, नवीन सर्विसनाऊ अहवालातून स्पष्ट
जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या अनेक सेवासुविधा मिळण्याचे वन-स्टॉप सोल्युशन वी ऍप बनावे या विचारावर आधारित वी फायनान्स हे विश्वसनीय आर्थिक संस्थांच्या सहयोगाने सुरु करण्यात आले आहे. व्यक्तिगत कर्ज, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि क्रेडिट कार्ड्स यासारख्या वेगवेगळ्या सुविधाजनक, सर्वसमावेशक व्यक्तिगत आर्थिक सुविधा प्रदान करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
वी चे सीएमओ श्री अवनीश खोसला यांनी सांगितले, “डिजिटल सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांच्या जीवनात सुविधा आणण्यासाठी आम्ही वी मध्ये बांधील आहोत. वी ऍपमध्ये वी फायनान्समार्फत आर्थिक सेवासुविधा सहजपणे, जलद गतीने आणि उपलब्ध होण्याजोग्या आर्थिक सुविधा देऊन आम्ही ग्राहकांना नेहमीच्या गुंतागुंती न येता, त्यांचे फायनान्सेस नियंत्रणात ठेवता यावेत यासाठी सक्षम बनवत आहोत. विश्वसनीय आर्थिक संस्थांसोबत आमची भागीदारी असल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजांनुरूप सुयोग्य उत्पादन मिळू शकेल हे नक्की. आम्ही असे मानतो की, हा डिजिटलला प्राधान्य देणारा, कागदविरहित दृष्टिकोन लाखो भारतीयांची फायनान्सेसचे व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलेल.”
वी फायनान्समध्ये पुढीलप्रमाणे व्यक्तिगत फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत –
वी फायनान्स, आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहयोगाने ग्राहकांना व्यक्तिगत कर्ज अगदी सहज आणि सुरक्षित पद्धतीने उपलब्ध होतात.
५०,००० रुपयांपासून पुढील किमतींच्या कर्जांसाठी ग्राहक अर्ज करू शकतात, व्याजदर देखील खूप आकर्षक आहेत, वार्षिक १०.९९% पासून पुढे.
ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि कागदरहित आहे, खूपच कमी डॉक्युमेंटेशन आणि सहजसोपे केवायसी आवश्यक असल्याने अचानक उद्भवणाऱ्या गरजेसाठी सुयोग्य आहे.
अपस्विंग फायनान्शियल टेक्नॉलॉजीज या फिनटेक स्टार्टअपसोबत धोरणात्मक भागीदारी करून वी फायनान्सने अशी एक बाजारपेठ उपलब्ध करवून दिली आहे, जिथे विविध आघाडीच्या बँका आणि आर्थिक संस्थांचे उच्च व्याजदर देणारे फिक्स्ड डिपॉझिट पर्याय उपलब्ध आहेत.
ग्राहक कमीत कमी १००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करून ८.४% टक्क्यांपर्यंत खात्रीशीर व्याज मिळवू शकतात, त्यामुळे लघुकालीन व दीर्घकालीन संपत्ती उभारणीसाठी चांगले आहे.
प्रति बँक ५ लाख रुपयांपर्यंतच्या एफडी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनअंतर्गत (आरबीआयच्या संपूर्ण मालकीची उपसंस्था) कव्हर्ड आहेत.
क्रेडिलिओच्या सहयोगाने, वी फायनान्सवर ग्राहकांना विविध आघाडीच्या बँका आणि आर्थिक संस्थांच्या क्रेडिट कार्ड्ससाठी अर्ज करता येतो. एसबीआय, ऍक्सिस बँक, एचडीएफसी इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
या प्लॅटफॉर्मवर एफडी-बॅक्ड क्रेडिट कार्ड्स देखील आहेत, त्यामुळे लो क्रेडिट हिस्ट्री असलेल्या पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असलेल्या ग्राहकांना त्यांचा क्रेडिट प्रोफाइल उभारता येईल.
कॅशबॅक, डिस्काउंट, रिवॉर्ड पॉईंट्स आणि ईएमआय पर्याय यांचा लाभ घेऊन ग्राहक कागदपत्र जमा न करता किंवा या प्रक्रियेतील कोणत्याही पारंपरिक अडचणी न येता क्रेडिटची शक्ती अनलॉक करू शकतील.
वी फायनान्स हे आता वी ऍपवर सुरु झाले आहे. देशभरातील ग्राहकांना सुरक्षित, सोपा आणि एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळण्याचा अनुभव घेता येईल. गूगल प्ले स्टोर किंवा ऍपल ऍप स्टोरवरून वी ऍप डाउनलोड करता येईल.
चढउतारांदरम्यान शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; सेन्सेक्स-निफ्टी वधारले, जाणून घ्या