AI मध्ये 2030 पर्यंत १०.३५ दशलक्ष नोकरीची संधी, नवीन सर्विसनाऊ अहवालातून स्पष्ट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
एजंटिक एआयद्वारे २०३० सालापर्यंत १०.३५ दशलक्ष नोकऱ्यांना नवीन स्वरूप दिले जाणे अपेक्षित असून, भारत जगातील सर्वांत मोठ्या मनुष्यबळ रूपांतरणासाठी सज्ज आहे, असा निष्कर्ष पीअरसनसोबत सहयोगाने सर्विसनाऊ एआय स्किल्स रिसर्च २०२५ या नवीन प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे.
प्रक्रियाधारित कामांपासून हेतूप्रेरित नवोन्मेषापर्यंत स्थित्यंतर साध्य करण्याची तसेच कामाचे पूर्णपणे नवीन स्वरूपातील भवितव्य प्रत्यक्षात आणण्याची स्थित्यंतरात्मक संधी भारतातील प्रतिभावंतांच्या विस्तृत समुदायाला असल्याचा संकेत या परिवर्तनामधून मिळत आहे.
चढउतारांदरम्यान शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; सेन्सेक्स-निफ्टी वधारले, जाणून घ्या
“एजेंटिक एआय मनुष्यबळाला नवीन आकार देत असल्याने तसेच २०३० सालापर्यंत १०.३५ दशलक्ष नोकऱ्यांचे स्वरूप बदलून टाकतानाच ३० लाखांहून अधिक नवीन तंत्रज्ञान नोकऱ्या निर्माण करणे अपेक्षित असल्याने भारताचा एआय प्रवास एका निश्चित वळणावर आहे,” असे सर्विसनाऊ इंडिया टेक्नोलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीत माथुर यांनी सांगितले.
सर्विसनाऊच्या एआय मॅच्युरिटी इंडेक्सने (AI Maturity Index) भारतीय एआय पेससेटर्स (अनुकरणीय ठरण्याजोगे प्रगतीशील किंवा यशस्वी घटक) निश्चित केले आहेत. हे पेससेटर्स पाच अचूक मार्गांद्वारे या स्थित्यंतराचे नेतृत्व करत आहेत. हे पाच मार्ग म्हणजे एआयबाबतची सुस्पष्ट दृष्टी, प्लॅटफॉर्मकेंद्री विचार, प्रतिभेचे अचूक मिश्रण, भक्कम प्रशासन आणि अचूक मोजमापासह एजेंटिक एआयची अंमलबजावणी. याचा प्रभाव लक्षणीय आहे- ५७ टक्के आस्थापनांनी कार्यक्षमता व उत्पादनक्षमता सुधारल्याचे कळवले आहे.
”एआयसाठी सज्ज प्रतिभेचा विकास करणे, कार्यप्रवाहांची पुनर्रचना करणे आणि व्यवसाय प्रारूपांना सातत्याने नवोन्मेषाच्या दिशेने वळवत राहणे यांद्वारे जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची स्थित्यंतरात्मक संधी भारताकडे आहे. भारतीय उद्योगांसाठी संदेश स्पष्ट आहे: विखुरलेल्या प्रयोगाचे युग आपल्या पाठीमागे आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकण्यासाठी आता धाडसी कार्यान्वयन, एकात्मिक व्यूहरचना तसेच विश्वास, पारदर्शकता व कौशल्य यांच्यावर आधारित मानव-एआय यांचा अस्सल समन्वय यांची आवश्यकता आहे,” असे सुमीत माथुर यांनी सांगितले.
जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या आणि गतीशील डिजिटल अर्थव्यवस्था यांच्यासह भारत पुढील पाच वर्षांच्या काळात ३० दशलक्ष तांत्रिक नोकऱ्यांची भर घालण्यास सज्ज आहे.
एआय मॅच्युरिटी इंडेक्समधून (AI Maturity Index) निदर्शनास येते की, रिअल-वर्ल्ड एआय तैनातीकरणाकडे जात असतानाच उद्योगांद्वारे एआय कन्फिग्युरेटर्स (६६ टक्के), एक्स्पीरियन्स डिझायनर्स (५७ टक्के) आणि डेटा साइंटिस्ट्स (६५ टक्के) आदी भविष्यकालीन नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत.
उद्योगांची समांतर पद्धतीने विस्तार करत राहण्याचीही महत्त्वाकांक्षा आहे आणि या अहवालाच्या निष्पत्तींमधून निदर्शनास येते की भारतीय कंपन्या प्रयोगांच्या आणि संकल्पनांच्या पुराव्यांच्या पलीकडे निर्धाराने वाटचाल करत आहेत, एआयचे व्यापक प्रमाणावर कार्यान्वयन करण्यासाठी धाडसी सज्जतेचे संकेत देत आहेत.
भारताचा एआय प्रवास लक्षणीय गती साध्य करत असतानाच, काही आव्हानेही आहेत. आव्हानांच्या यादीत डेटा सुरक्षितता पहिल्या क्रमांकावर आहे, ३० टक्के भारतीय उद्योगांना डेटा सुरक्षिततेची चिंता भेडसावत आहे आणि हे प्रमाण या भागातील सर्वाधिक आहे. शिवाय, २६ टक्के कंपन्यांमध्ये भविष्यकाळात आवश्यक ठरू शकेल अशा कौशल्यसंचाबद्दल सुस्पष्टता नाही.
धोरणात्मक दृष्टी आणि नवीन कौशल्यांचा रचनाबद्ध, बहुकार्यात्मक विकास करण्याचे मार्ग निश्चित करण्याची गरज तातडीने असल्याचे यावरून दिसून येते. या संभाव्यतेची खऱ्या अर्थाने जोपासना करण्यासाठी भारतीय उद्योगांनी कर्मचाऱ्यांना एआय निष्पत्तीचे परीक्षण करण्यासाठी सक्षम तर केलेच पाहिजे, शिवाय त्यांना आकार देणाऱ्या प्रक्रिया व डेटाबद्दलही सक्रियरित्या प्रश्न उपस्थित करत राहिले पाहिजे.
एआय-सक्षम कंपनी होणे म्हणजे विश्वास निर्माण करणे, स्वायत्ततेची जोपासना करणे आणि सर्व भूमिकांमधील मानवी संभाव्यता वाढवण्यासाठी एआयचा समावेश अखंडितपणे करत राहणे.
कामगारकेंद्री अर्थव्यवस्थेकडून एआयसक्षम अर्थव्यवस्थेकडे स्थित्यंतर करत असतानाच, जबाबदार नवोन्मेषाचे जागतिक मापदंड स्थापित करण्याची तसेच आपल्या संभाव्य प्रतिभेची संपूर्ण शक्ती खुली करण्याची ऐतिहासिक संधी भारताला आहे.
सिगारेट उत्पादक कंपनी २:१ बोनस शेअर्स जाहीर करणार! संचालक मंडळाच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय