फोटो सौजन्य - pinterest
प्रत्येकाची इच्छा असते कि आपल्ल्याकडे खूप पैसे असावे. आपला आयुष्य धनदौलत आणि ऐश्वर्याने नटलेले असावे. पण ते पैसे आणायचा तरी कुठून या प्रश्नाचं उत्तर लोकांना काही सापडत नाही. मुख्यतः असे स्वप्न जास्त करून मध्यम वर्गीयांना पडतात. सकाळी ९ वाजता घर सोडून संध्यकाळी ५ वाजता घरी येणे याने फक्त नि फक्त जीवन घालवता येतं, जगता नाही येत. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल तर इन्वेस्टमेन्टच्या या खोल दर्यात उतरावंच लागत. प्रत्येकाचे वेगवेगळ्या आकांशा असतात. कुणाला ड्रीम कार घ्यायची असते, तर कुणाला त्यांच्या पोराबाळांना शहरातील मोठ्या शाळेत शिकवायचं स्वप्न असतं. कुणाला म्हातारपणाची सोय करायची असते, तर कुणाला पैसाची आवड असते. जर तुमचेही असे ख्वाब असतील तर फक्त नोकरी हा तुमचा पर्याय नाही आहे. नोकरी तुम्हाला कॅपिटल देईल. पण तो वाढवायचा कसा आणि ते वाढवून स्वप्न जगायची कशी हे तुमच्या हातात आहे.
इन्व्हेस्टमेंट तुमच्या स्वप्नांनाच्या बोटीला दिशा देण्याचा काम करते. जर तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य दिशेला आहे. तर नक्कीच तुमची स्वप्नांची बोट किनार्यापर्यन्त पोहचण्यात कुणीच अडवू शकत नाही. इन्व्हेस्टमेंट करण्याची एक पद्धत असते. त्या पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे. या पद्धतीला गोल बेस्ड इनवेस्टमेंट म्हणतात. जर तुम्ही या पद्धतीने दर माह २०,००० रुपये २५ वर्षांसाठी एका १२% रिटर्न्स देणाऱ्या कंपनीत गुंतवले तर तुम्ही या २५ वर्षात 3.8 कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.
इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे गोल निश्चित करणे. जर डेस्टिनेशनच माहिती नसेल तर प्रवासाला काही अर्थ नसतो. गोल बरोबर त्यासाठी लागणारी रक्कम ध्यानात ठेवणे फार गरजेचे असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या ड्रीम कारसाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात तर त्या कारची तुम्हाला किंमत माहिती असणे फार गरजेचे आहे. जर तुमचे ध्येय लवकर पूर्ण होणारे असेल तर तुम्ही कमी रिस्कवाल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता, परंतु जर तुमचे ध्येय दूरचे असेल तर थोडं आणखीन रिस्कवाल्या पर्यायाचा विचार केलात तरी चालेल. इन्व्हेस्टमेंट करताना कुण्या तज्ञाचे किंवा नियमित गुंतवणूकदराचा सल्ला घेत चला याने आपलं ज्ञान वाढेल. ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट या तंत्र ज्ञानाचा वापर करून दर महिन्याला इन्वेस्टमेन्टच्या वेळी येणार ताण टाळता येतो तर या तंत्रज्ञानाचा केलेला वापर कधीही बेहत्तर ठरेल. तुमचा निवेश तुम्ही नियमितपणे बघत जा. जर गरज पडेल तर परिस्थिती बघून त्यात बदल करा. अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून ध्येय गाठा.