वीरेंद्र सेहवाग(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill is Aryavir Sehwag’s favourite captain: दिल्ली प्रीमियर लीग २०२५ मध्ये सध्या सर्वांच्या नजरा या वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागवर जाऊन खिळल्या आहेत. १७ वर्षीय आर्यवीर सेहवाग हा सेंट्रल दिल्ली किंग्जचा सदस्य आहे. ज्याला संघाने ८ लाख रुपयांनया खरेदी करण्यात आले आहे. अद्याप त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. तरी त्याच्या बॅटिंग पॉवर-हिटिंगबद्दल सर्वत्र आधीच चर्चा रंगली आहे. अलीकडेच आर्यवीर सेहवागने एका मुलाखती दरम्यान त्याच्या आवडत्या कर्णधाराबद्दल माहिती दिली आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी ओमान क्रिकेट संघ जाहीर! जतिंदर सिंहची कर्णधारपदी वर्णी
आर्यवीरला शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यापैकी एक आवडता खेळाडू निवडण्यास सांगण्यात आले. तेव्हा आर्यवीरने न कचरता शुभमन गिलचे नाव घेतले. इतकेच नाही तर गिलची निवड यावरच थांबली नाही, तर शुभमन गिलने धोनी आणि रोहित शर्माला देखील पिछाडीवर टाकले आहे.
सर्वात मोठा धक्का तेव्हा होता जेव्हा आर्यवीरने शुभमन गिलला महेंद्रसिंग धोनीसारख्या महान कर्णधारापेक्षा वरचढ मानले. एवढेच नाही तर त्याने श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनऐवजी शुभमन गिलची निवड देखील केली. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आला तेव्हा त्याने रोहित शर्माऐवजी शुभमन गिलचे नाव तोंडात आले. रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शर्मा अहा लाखो तरुणांसाठी एक आदर्श खेळाडू आहे, परंतु आर्यवीरने सेहवागने शुभमन गिलच्या नावाला प्राधान्य देऊन सर्वांना चकित केले आहे.
या गोष्टीवर पडदा इथेच पडत नाही. तर अजून देखील काही गोष्टी पुढे घडतात. जेव्हा विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा आर्यवीरने स्पष्टपणे सांगितले की त्याचे वडील वीरेंद्र सेहवाग नेहमीच सचिन तेंडुलकरला आपला आवडता खेळाडू मानत आले आहेत. परंतु त्याने स्वतः विराट कोहलीची निवड केली कारण त्याच्या दृष्टीने कोहली या पिढीचा महान फलंदाज असल्याचे बोलला आहे.
आर्यवीर सेहवागने केलेल्या खेळाडूंच्या या निवडी स्पष्टपणे ही सांगतात की, भारातच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल नवीन पिढीच्या क्रिकेटपटूंमध्ये खूप वेगाने लोकप्रिय होत असल्याचे दिसतं आहे.