
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
देशांतर्गत बाजारातील सकारात्मक वातावरण आणि अमेरिकी ट्रेझरी यील्ड्समधील घसरणीमुळे शुक्रवारी रुपया १२ पैशांनी वधारला. पण आज त्यात घसरण झाली. पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे आज कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास ३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड सध्या ३.०४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९०.७८ डॉलरवर व्यवहार करत आहे. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, शेअर बाजारातून झालेल्या परकीय भांडवलाच्या बहिर्वाहानेही रुपयाच्या घसरणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
रुपयावर दबाव असूनही, डॉलर निर्देशांक किंचित घसरून १०0.५४ वर आला आहे. म्हणजे त्यात ०.०५% इतकी घसरण झाली आहे. हा निर्देशांक सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे मूल्य मोजतो. दरम्यान, आज शेअर बाजारात घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात BSE Sensex जवळपास ६०० अंकांनी घसरला आहे. तर निफ्टी १५० हून अधिक अंकांनी खाली आला.
एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ३७६.४१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स विकल्यामुळे रुपयाचं मुल्य कमी झालं आहे. याव्यतिरिक्त, रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, १० जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ९६४ दशलक्ष डॉलरने वाढून ६७५.१५७ अब्ज डॉलर झाला आहे.