जगाची अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी, भारताची अर्थव्यवस्था 90 टक्क्यांनी वाढतीये - पंतप्रधान मोदी
देशात गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. या काळात जगाची अर्थव्यवस्था ३५ टक्क्यांनी वाढली असताना, देशाची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या दशकात भारताने गरिबी कमी करण्यात अभूतपूर्व यश मिळविले आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका माध्यम समुहाच्या कार्यक्रमामध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांंनी भारताची आर्थिक प्रगती, गरिबी निर्मूलन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. तसेच गेल्या दशकात भारताने केलेली प्रगती आणि लोकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल सांगितले आहे.
विकासाच्या आश्वासनाचा परिणाम
गेल्या 10 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था 90 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. हे भाजप सरकारने दिलेल्या विकासाच्या आश्वासनाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर हा भविष्यातही कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. हा विकास केवळ आश्वासने नसून, भविष्यातही कायम राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहे.
हेही वाचा – तब्बल 47,500 कोटी संपत्तीची मालकीन, वाचा… कोण आहे ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला!
Speaking at the @EconomicTimes World Leaders Forum. #ETWLF https://t.co/D6UEyl46Ps
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2024
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा सरकारच्या कामाचा मंत्र
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा मंत्र केंद्रातील सरकारच्या कामकाजाचा आधार आहे. या मंत्रांद्वारे सरकारकडून देशात अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे भारतीयांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. देशवासियांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या सुधारणांमुळे देशातील जीवनमान सुधारले आहे आणि प्रगतीला चालना मिळाली आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
तरुण, महिलांचा सरकारला पाठिंबा
गेल्या दशकातील देशाच्या कामगिरीचा विचार करता भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. हा आत्मविश्वास भारताच्या विकास आणि नवीन सुधारणांसाठी महत्वपुर्ण ठरत आहे. अनेक देशांमध्ये सरकारांना आव्हानांचा सामना करावा लागत असताना, भारतातील परिस्थिती वेगळी आहे. भारतातील तरुण आणि महिलांनी सातत्य आणि देशातील राजकीय स्थिरतेसाठी मतदान केले आहे. जे सरकारच्या प्रगती आणि स्थिर सरकारला पाठिंबा दर्शवत आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.