डॉलर नाही तर 'हे' आहे जगातील सर्वात मौल्यवान चलन; वाचा... रुपयाच्या तुलनेत कितीये त्याची किंमत?
जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हटला की सहज अमेरिकेते नाव ओठांवर येते. जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेची ओळख आहे आणि या महासत्तेचे चलन डॉलर आहे. जागतिक व्यवहारासाठी जगभरात डॉलर वापरला जातो. परकीय व्यापारातील व्यवहार केवळ डॉलरमध्येच होतात. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत डॉलरला मोठा दर्जा आहे. या गोष्टी लक्षात घेता डॉलर हे जगातील सर्वात महागडे चलन आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर थोडे थांबा. कारण, जगात असेही काही चलन आहेत जे, डॉलरला मागे टाकतात. याच पार्श्वभुमीवर आज आपण जगातील सर्वात महागड्या चलनांबाबत जाणून घेणार आहोत…
ही चलने आहेत सर्वात मौल्यवान
उपलब्ध माहितीनुसार, डॉलर हा जगातील सर्वात मजबूत चलनाच्या यादीत 10 व्या स्थानावर आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, सर्वात मौल्यवालन चलन डॉलर नाही. तर मग जगातील सर्वात महागडे चलन कोणते? जगातील सर्वात महागड्या चलनात कुवैती दिनार, यानंतर दुसरे महागडे चलन म्हणजे बहरीनी दिनार यांचा समावेश आहे.
बहरीन हा देखील कुवैत प्रमाणे तेल निर्यातदार देश आहे. बहरीनच्या एका दिनारची किंमत 223.09 रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ओमानचे ओमानी रियाल आहे. हे जगातील तिसरे सर्वात मौल्यवान चलन आहे. एका ओमानी रियालची किंमत 218.40 रुपये आहे. तर जॉर्डन दिनार हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मजबूत चलन आहे. एका जॉर्डनियन दिनारची किंमत 118.60 रुपये आहे.
‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे चलन
महासत्ता असलेल्या अमेरिकेचे डॉलर किंवा एकेकाळी अर्ध्याहून अधिक जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडचे पाऊंड हे जगातील सर्वात मौल्यवान चलन असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, सर्वात मौल्यवान चलनाच्या यादीत अरब देशाचे चलनाचा समावेश होतो. त्यानुसार, कुवैती दिनार हे जगातील सर्वात मौल्यवान चलन आहे.
कुवैती दिनार सर्वात महागडे ठरण्याचे कारण म्हणजे हा देश तेल निर्यातदार आहे. तेलाच्या उत्पादनामुळे कुवेत आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आणि स्थिर आहे. तेलाचे साठे आणि करमुक्त प्रणालीमुळे कुवैती दिनार हे जगातील सर्वात मौल्यवान चलन ठरते. एका कुवैती दिनारचे भारतीय रुपयात मूल्य अंदाजे 274 रुपये इतके आहे. हे मुल्य लक्षात घेता जगातील सर्वात मौल्यवान चलनामध्ये या चलनांचा समावेश होतो.
हे देखील वाचा – टाटांच्या ‘या’ कंपनीची कमाल, 5 दिवसात छापले 57 हजार कोटी रुपये; वाचा… सविस्तर!
डॉलर कितव्या स्थानावर
जगातील सर्वात मौल्यवान चलनाची यादी लक्षात घेतल्यास, पहिल्या दहा मैल्यावान क्रमांकाच्या यादीत अनुक्रमे कुवैती दिनार, बहरीनी दिनार, ओमानचे ओमानी रियाल, जॉर्डन दिनार, ब्रिटीश पौंड, जिब्राल्टर पौंड, केमन आयलंड डॉलर, स्विस फ्रँक हे स्वित्झर्लंड आणि लिकटेंस्टीनचे चलन आहेत आणि अमेरिकन डॉलरचा क्रमांक लागते. डॉलर हे जागतिक स्तरावर सर्वाधिक स्वीकारले जाणारे चलन आहे. असे असले तरी जगातील सर्वात मौल्यवान चलनांच्या यादीच 10 व्या स्थानावर आहे.