इंडो तिबेट बॉडर पोलिस मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासंबंधी नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. या भरतीची अर्जप्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ITBP (आयटीबीपी) अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर अर्ज करु शकतात. अर्जप्रक्रियेची संपूर्ण माहिती नोटीफिकेशनमध्ये मिळेल.
कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत?
इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये अनेक पदांसाठी भरती आहे. एकूण 128 जागा रिक्त असून त्यातील सर्वाधिक 115 जागांची भरती या कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्टसाठी आहेत. त्याचप्रमाणे, पुरुष आणि महिला हेड कॉन्स्टेबल ड्रेसर (पशुवैद्यकीय) साठी एकूण 9 जागा आहेत, तर पुरुष कॉन्स्टेबल केनलमनच्या पदासाठी एकूण 4 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये करण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करु शकतो. हेड कॉन्स्टेबल ड्रेसर व्हेटर्नरी आणि कॉन्स्टेबल केनेलमनसाठी, 10 वी पास सह आयटीआय/पॅरा व्हेटर्नरी कोर्स/प्रमाणपत्र किंवा व्हेटरनरी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 25 आणि 27 वर्षांच्या दरम्यान असावे. नियमानुसार वयामध्ये सवलत दिली गेली आहे.
पगार
हेड कॉन्स्टेबल ड्रेसर व्हेटर्नरी पदासाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांचा पगार दरमहा 25,500 ते 81,100 रुपये .
कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट, कॉन्स्टेबल, केनेलमन यांचा पगार दरमहा 21,700 ते 69,100 रुपये
अर्ज शुल्क
या भरतीच्या अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी इडब्लूएस या प्रवर्गांच्या उमेदवारांना 100 रुपये शुल्क द्यावे लागेल तर एससी/ एसटी/ एक्स सर्व्हिसमॅन/ महिला उमेदवार यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागू होणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 सप्टेंबर 2024
अर्ज भरण्याच्या पायऱ्या
ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यामध्ये पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती 2024 विभाग निवडा.
ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करुन अर्जाचा तपशील भरा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.