BJP criticized Shinde Group: मुंबई भाजप कायकर्त्यांकडूनच '50 खोके एकदम ओके'ची घोषणाबाजी; शिंदे गटाचा संताप
Delhi High Court News: केंद्र व आरबीआयला दिल्ली हायकोर्टाचा दणका! डिजिटल लोन अॅप्सची होणार चौकशी
एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले, कुठल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या घोषणा दिल्या, हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहेत. त्यामुळे अशा घोषणा देण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकदा विचारा, अशा घोषणा देणारे मंत्री आज कुठे गेले, तेही एकदा तपासून पाहा. तसेच आज आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका. ज्यांनी या घोषणा दिल्या, त्यांची संस्कृती कुठे गेली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मुंबईतील चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १७३ मध्ये शिंदे सेनेच्या पूजा कांबळे विरूद्ध भाजपच्या शिल्पा केळूस्कर यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. (BJP Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या उमेदवारी शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते प्रभागात प्रचार करत होत्. प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समोर पाहताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यास सुरूवात केली.
“कोणी हलक्यात घेऊ नये, इलाका किसी का भी हो धमाका हम करेंगे; DCM एकनाथ शिंदेंचा पुण्यातून एल्गार
घोषणा देणारे दत्ता केळुस्कर म्हणाले की, आमच्याकडून चुकीचे शब्द वापरले गेले. जाहीर केलेल्या प्रॉपर्टीनुसार ‘५० खोके’ नव्हे तर ‘अकरा खोके एकदम ओके’ अशी घोषणा द्यायला हवी. ११ कोटींची जंगम मालमत्ता कुठून आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही घोषणा फक्त रामदास कांबळे आणि त्यांच्या पत्नी उमेदवारापुरती वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझे तिकीट चोरल्याचा आरोप करत त्यांनी ही लढाई होणारच असल्याचे सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.






