अजिंठ्यात दूषित पाण्याचा विळखा! महिनाभरापासून व्हॉल्व्हला गळती, ग्रामपंचायत दखल घेईना (photo Credit - X)
अजिंठा येथे गत महिन्यापासून गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागल्याने गत एक महिना पूर्वी व्हाल जवळ खड्डा खणण्यात आला होता दुरुस्ती न केल्यामुळे लिकेज व्हॉल्व्हमध्ये मिसळल्यामुळे गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या साथरोगाने गावांमध्ये प्रवेश केला तर आवरणे कठीण होईल.
ग्रामस्थांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिले आहे. परंतु यावरील उपाययोजना त्यांच्याकडून युद्धपातळीवर केल्या जात नाहीत. जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या तरी ग्रामपंचायतीने त्वरित याकडे लक्ष घालून ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गावांमध्ये गत महिन्यापासून पाणीपुरवठा पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागली आहे. त्यामुळे त्या खट्टयातील पाण्यात मोकाट प्राणी पाणी पितात, बसतात. परिणामी पाणी दुषित होते व हाच दुषित पाणीपुरवठा गावाला होत आहे. यामुळे गावात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला, परंतु ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतने गांभीयान या प्रकाराकडे लक्ष द्यावे व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरज मंडावरे, शेख रफीक आदींसह नागरिकांनी केली आहे.






