फोटो सौजन्य - Social Media
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)मध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. एकूण २३४ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरात ही भरती आयोजित करण्यात आली आहे. मुळात, ही भरती ज्युनिअर एकजिक्यूटिव्ह ऑफिसर पदासाठी आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी HPCL च्या hindustanpetroleum.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीच्या प्रक्रियेबद्दल:
HPCL भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची ऑनलाईन विंडो सुरु करण्यात आली आहे. १५ जानेवारी २०२५ पासून ही भरती सुरु करण्यात आली आहे. तर उमेदवारांना १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क म्हणून उमेदवारांना १,१८० रुपये भरायचे आहे. यामध्ये १८% GST आकारण्यात आली आहे. तसेच EWS आणि OBC या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायची आहे. SC तसेच ST या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PwBD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील निशुल्क अर्ज करायचे आहे.
मॅकेनिकल विभागातील ज्युनिअर Executive पदासाठी एकूण १३० जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिक विभागात या पदासाठी ६५ जागा रिक्त आहेत. इंस्ट्रुमेंटेशनमध्ये ३७ जागा तर केमिकल विभागामध्ये २ जागा रिक्त आहेत. अशा एकूण २३४ जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहे. जाणून घेऊयात काही पात्रता निकष:
HPCL च्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी काही शैक्षणिक आणि वयोमर्यादे संबंधित अटी शर्तीना पात्र करणे अनिवार्य आहे. जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. OBC उमेदवारांना अधिक ३ वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. SC तसेच ST उमेदवारांना अधिक ५ वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अधिक १० ते १५ वर्षांपर्यंत सूट देण्यात येईल.
निवड प्रक्रिया
HPCL च्या या नियुक्तीच्या प्रक्रियेत पुढील चार टप्प्यांचा समावेश आहे: