फोटो सौजन्य - Social Media
अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. अडचणीवाचून जीवन नाही. जर तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे आहे तर अडचणींना सामोरे जाऊन त्यांना मात करणे भागच आहे. जितके ध्येय मोठे तितक्या अडचणी जास्त असतात. मुळात, जीवन जगण्याची मज्जा तेव्हाच येते जेव्हा अडचणी समोर येतात. आजवर इतिहासाच्या पानांमध्ये ज्या ज्या व्यक्तींचे नाव आहेत, त्या साऱ्यांनी भल्या मोठ्या अडचणींना पुरून उरले आहे. एकंदरीत, अडचणी जिंकणे म्हणजेच जीवन जिंकणे होय. अनेकदा अनेक व्यक्ती या अडचणींना घाबरून जीवनात डगमगून जातात. असे व्यक्ती ध्येयप्राप्ती सोडा, कालांतराने आपले ध्येयच विसरून जातात. अनेक कारणांमुळे अशा गोष्टींचं सामना करावा लागतो, जेव्हा लोकं स्वप्न बघणे सोडत नाहीत परंतु त्यांना जगणे सोडून देतात.
हे देखील वाचा : महावाचन उत्सवाला विक्रमी प्रतिसाद !1 लाखाहून अधिक शाळांनी घेतला सहभाग
ध्येयप्राप्तीच्या या लढ्यामध्ये अनेक लोकं अशी आहेत, ज्यांच्याकडे काही नसूनसुद्धा या लढ्यात बाजी मारत आहेत. अशामध्ये आपल्याकडे सगळे काही असून काहीजण हार मानत आहेत. अशा व्यक्तींसाठी काही आदर्श व्यक्तिमत्व समाजामध्ये उभारून येत आहेत. भिलवाडाचे राहणारे वसंत कुमार भंडारी यापैकी एक आहेत. डोळ्यांनी अंध असणाऱ्या वसंतने आयुष्यात कधी हे जग पाहिले नाही आहे. तरीही या व्यक्तीने जग जिंकण्याचे सामर्थ्य मनी बाळगले आहे. आपल्या अंधपणाला कधीही वाटेमध्ये अडचण बनू दिली नाही. वसंतने न डगमगता आपल्या ध्येयाच्या वाटेने प्रवास सुरु ठेवला. आज वसंत एक शिक्षक असून एका विद्यालयाचा मुख्याधापक आहे. शाळेतील प्रत्येक मुलासाठी तसेच जगातील प्रत्येक माणसासाठी त्याची कथा अतिशय प्रेरणादायी आहे.
लहान असताना वसंत यांच्या पालकांना अनेक जण येऊन म्हणायचीत कि,” तूमच्या मुलाकडून काही होणार नाही, हा काही करू शकत नाही.” वसंत यांनी अशा लोकांना त्यांच्या कर्तृत्वाने उत्तर दिले आहे. मनामध्ये जिद्द असेल तर प्रत्येक गोष्टी शक्य आहेत. शिक्षण घेत असताना वसंत यांना अनेक गोष्टींचा त्रास झाला. जिना चढणे आणि उतरणे हा मुख्य त्रास होता. एकदा तर घरी कन्स्ट्रक्शनचे काम चालू असताना वसंत गच्चीवरून खाली पडला होता. अशा अनेक गोष्टींचा सामना करत आज तो या टप्पयावर पोहचला आहे.