काय प्रकरण नेमकं?
पुण्यात जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी आरोपींना मदत केळ्याचा आरोप बंटी जहागिरदार याच्यावर ठेवण्यात आला होता. बंटी जहागीरदार २०२३ पासून जामिनावर बाहेर आला होता. त्यादरम्यान, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी जहागिरदार याच्यावर गोळ्या झाडल्या. याच हल्यात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती आहे.
तपास सुरु
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गोळीबाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना केले आहेत. आरोपींनी हल्ला करण्याचं मागचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस याचा देखील तपास करत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात तणावाची स्थिती आहे.
जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला, आरोपी नागरिकांच्या मदतीने ताब्यात
जळगाव येथून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सिनेस्टाइल पाठलाग करून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या छातीवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर झखमी झाला. साई बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये घडली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने संशयितांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपीचे नाव शुभम सोनवणे असे आहे. जळगाव महापालीकेत उमेदवारांना अर्जाची छाननी सुरु असतांना बाजूच्या मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होते.
Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार
Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा ही घटना घडली.
Ans: असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Ans: हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास सुरू आहे.






