फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सैन्यात भरती होण्याचे आणि देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असण्याचे स्वप्न पाहत असलेल्या उमेदवारांनासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये भारतीय सैन्यामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवातही केली आहे. जर तुम्हीही या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू पाहत आहात तर नोव्हेंबरच्या ५ तारखेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. या तारखेआधी उमेदवारांना अर्ज करण्यास भाग आहे, अन्यथा वेळेनंतर केले गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित ! वैद्यकीय शिक्षणाच्या 900 जागा वाढल्या
भारतीय सैन्याच्या या भरतीमध्ये ९० रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी देशभरातून अनेक उमेदवार इच्छुक आहेत, त्यामुळे मोठी स्पर्धा असल्याने इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी लवकर अर्ज केले तर बेहत्तर ठरेल. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर जाहीर केले गेलेल्या अधिकृत अधिसूचनेचाही आढावा घ्यावा. तसेच अधिसूचनेमध्ये काही अटी शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. या अटी शर्तीना पात्र उमेदवाराचं या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
अधिसूचनमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्ससारख्या विषयांमध्ये किमान ६०% गुणांनी उत्तीर्ण हवा. तसेच उमेदवार JEE मेन्सच्या परीक्षेत उपस्थित आणि उत्तीर्ण असावा. या अधिसूचनेमध्ये वयोमर्यादा नमूद आहे. एकंदरीत, एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. १६ वर्षे ६ महिने आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त १९ वर्षे ६ महिने आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : TIFR मध्ये क्लर्क तसेच असिस्टंटसारख्या अनेक पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
अशा प्रकारे करता येईल अर्ज:






