जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! (photo Credit- X)
कसारा केंद्रांतर्गत ३६ जिल्हा परिषद शाळा व ४ खाजगी शाळा कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या शैक्षणिक केंद्र शाळेतच मूलभूत सुविधा दुरवस्थेत असल्याने पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्याच स्वच्छता गृहाचा वापर करत होते. त्याठिकाणी पाण्याचा तुटवडा होत असल्यामुळे मुलांना उघड्यावर जावे लागत असल्याचे बोलले जात आहे.
अस्वच्छतेमुळे वर्गामध्ये दुर्गंधी पसरत असून संपूर्ण शालेय वातावरण दूषित होत आहे. याचा थेट परिणाम इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान निदर्शनास आले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना त्वचारोग, श्वसनाचे विकार, संसर्गजन्य तसेच मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्राथमिक केंद्रीय शाळेत शिक्षण परिषद घेतली जाते.
परिसरातील बहुतांश शिक्षक-शिक्षिका उपस्थित असतात. तसेच इतर कार्यक्रमही याठिकाणी साजरे केले जातात. यातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ये-जा असताना अशा अस्वच्छतेमुळे सर्वांनाच गैरसोयीचा सामना करावा लागतो.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे खडेबोल ठाकरे गटाचे तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांनी तालुका प्रशासनाला सुनावले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत शाखाप्रमुख अनंत शिंदे, उपशाखाप्रमुख प्रशांत पवार, आकाश वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…






