फोटो सौजन्य - Social Media
कायदा क्षेत्रातील शिक्षण घेऊन भविष्यात न्यायालयीन कामे करण्याची संधी मिळते. न्यायालयात विविध भूमिका बजावण्याची संधी मिळते. कायदा क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या बहुतेक जणांना वाटते कि लॉचे शिक्षण केल्यावर फक्त वकिली करता येते. वकील बनण्याशिवाय इतर काहीच पर्याय नसल्याचे बहुतेक जणांचे मानने आहे. परंतु, असे मुळीच नसते. कायदा क्षेत्रात शिक्षसन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे वकिलीशिवाय इतर पर्यायही उपलब्ध असतात, ज्यामध्ये विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतात. जर तुम्हालाही अशा क्षेत्रांबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
हे सुद्धा वाचा : मुंबई महापालिकेत जम्बो भरती, लिपिक पदाच्या 1846 जागा भरल्या जाणार; आत्ताच करा अर्ज…
भारतात कायदा क्षेत्राला खूप सम्मान दिला जातो. अनेक विद्यार्थी या क्षेत्रात शिक्षण घेत असतात. भारतातील जनता न्यायासाठी या क्षेत्रावर अवलंबून असतात. एकंदरीत, भारतीयांचा कायदा क्षेत्रावर भरपूर विश्वास असतो. या क्षेत्रात करिअर करू इच्छुक असणारे बहुतेक विद्यार्थी विशेषकरून वकील बनण्याच्या उद्देशाने हे क्षेत्र निवडतात. परंतु, यातील अनेक जणांना कायदा क्षेत्रातील अन्य विकल्पांबद्दल काहीच ठाऊक नसते. यात ते चुकी करून बसतात. त्यामुळे वकील बनण्याच्या शर्यतीत स्पर्धेला वाढ होते. त्यातील अनेक जण या स्पर्धेतून बाद होतात. चला मग जाणून घेऊया कायदा क्षेत्रातील अशा विकल्पांबद्दल जेथे तुम्ही आपले करिअर बनवू शकता.
कॉर्पोरेट क्षेत्रात कायदा क्षेत्रातील अभ्यासकांची फार गरज असते. त्यांना वेळोवेळी कायदा विश्लेषकाची आवश्यकता भासते. यामुळे कायदा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एक संधी प्राप्त होते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कायदेशीर अनुपालन, करार वाटाघाटी, विलीनीकरण आणि अधिग्रहण, बौद्धिक संपदा हक्क आणि रोजगार कायदाविषयक सल्ला मिळवण्यासाठी कायदा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्याचबरोबर पत्रकारितेच्या क्षेत्रातही करिअर करू शकतात. त्याचबरोबर कायदा क्षेत्रात लेखन करू शकतात. पत्रकारितेत कायदा माहिती असणे याची फार गरज असते त्यामुळे कायदा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेत उत्तम संधी निर्माण होतात.
हे सुद्धा वाचा : मोठी बातमी ! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख लवकरच जाहीर होणार
पत्रकारितेबरोबर शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यपक म्हणून काम करता येऊ शकते. कायदा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल शिकवण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर अकॅडमिक पेपर पब्लिश करण्याची जबाबदारीही मिळू शकते. अनेक व्यवसायांना लीगल सल्लागाराची गरज आहे. यामध्ये कायदा क्षेत्रातील विद्यार्थी भविष्यात कायद्याविषयक सल्ला देण्याचा काम करू शकतो. अनेक व्यवसाय अशा अभ्यासकांच्या शोधात असतात.