केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथीत गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचे स्वस्त वर्जन दाखवत आहे. पहिल्या नजरेत हा फोन हुबेहुब गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा सारखा वाटत आहे. क्लोन फोनचे रियर कॅमेरा मॉड्यूल डिझाईन कंपनीच्या अधिकृत फोनच्या लीक झालेल्या रेंडर्ससारखे आहे. तसेच क्लोन फोनचा वॉलपेपर देखील कथित अधिकृत इमेज सारखा दिसत आहे. मात्र जेव्हा तुम्ही हा क्लोन फोन अत्यंत जवळून आणि निरखून बघता, तेव्हा सत्य तुमच्या समोर येतं. (फोटो सौजन्य – instagram)
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर क्लोन डिव्हाईसमध्ये 3GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. हे स्पेसिफिकेशन्स सध्याच्या एंट्री-लेवल फोनच्या हिशोबाने देखील अत्यंत खराब आहेत. फोनची विक्री करणाऱ्या विक्रेत्याने असा दावा केला आहे की, फोनमध्ये 5G सपोर्ट आहे. मात्र परफॉर्मंस आणि यूजर एक्सपीरियंसच्या बाबतीत हे डिव्हाईस फ्लॅगशिप फोन्सपासून प्रचंड दूर आहे.
एवढंच नाही तर या फोनमध्ये ना सॅमसंगचे खरे सॉफ्टवेयर इकोसिस्टम मिळणार ना या डिव्हाईसमध्ये गॅलेक्सी AI सारख्या फीचर्सचा अनुभव मिळणार आहे. या क्लोन फोनमध्ये सॉफ्टवेयर अपडेट कधी दिले जाणार, याबाबत देखील कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. या फोनकडून तुम्ही प्रगत कॅमेरा प्रोसेसिंगची अपेक्षा करू शकत नाही आणि एकंदरीत, हे फक्त प्रचाराचा फायदा घेण्यासाठी डिझाइन केलेले एक डिव्हाईस आहे.
AI Impact Expo 2026: AI होणार अधिक शक्तिशाली? मानव मागे पडणार? Dario Amodei यांचा धक्कादायक दावा
स्वस्त आणि नकली स्मार्टफोन बाजारात येणं ही नवीन गोष्ट नाही. सहसा लीक्स आणि व्हायरल होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊन क्लोन फोनचे डिझाईन तयार केले जाते आणि हे फोन अत्यंत कमी किंमतीत विकले जातात. क्लोन फोन दुरून खऱ्या स्मार्टफोनसारखे दिसू शकतात, परंतु फीचर्समध्ये आणि क्वॉलिटीमध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे फोन खरेदी करताना सावध राहणं अत्यंत गरजेंच आहे, अन्यथा तुमची फसवणूक केली जाऊ शकते.






