फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे राज्यातील विविध विभागांमध्ये भूकरमापक (Land Surveyor) पदांची एकूण 903 पदे भरण्यात येणार आहेत. या संधीमुळे अभियांत्रिकी व ITI धारक उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
रिक्त पदांची विभागनिहाय संख्या
पुणे विभागात 83 जागा भरण्यात येणार आहेत. कोकण विभागात 259 जागा भरण्यात येणार आहेत. नाशिक विभागात 124 जागा तर छत्रपती संभाजीनगर विभागात 210 जागा भरण्यात येणार आहेत. अमरावती विभागात 117 जागा तर नागपूर विभागात 110 जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकड काही शैक्षणिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मुळात, उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात डिप्लोमाधारक असावा किंवा निदान 10वी उत्तीर्ण सहित त्याच्याकडे ITI (Surveyor) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराकडे मराठी टंकलेखन (30 शब्द प्रति मिनिट) व इंग्रजी टंकलेखन (40 शब्द प्रति मिनिट) यासंबंधी शासनमान्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे (२४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणना) निश्चित करण्यात आली आहे तर उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्जाची सुरुवात 1 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आली. तर उमेदवारांना 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्जाची पद्धत ऑनलाईन पद्धतीने निश्चित करण्यात आली असून त्यासाठी ibpsreg.ibps.in/gomsep25 या संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज शुल्क
अधिकृत संकेतस्थळ
अधिक माहिती व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी: mahabhumi.gov.in
भूमी अभिलेख विभागाची ही मेगा भरती 2025 ही नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून निश्चित मुदतीत अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.