• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • Embelee Water Life Mission Faces Embezzlement Of Two Crores Poor Work Leaves The Village Still Thirsty

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच

केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ९६.५० लाख रुपये असा एकूण १.९३ कोटींचा निधी मंजूर करून खर्चही दर्शविण्यात आला. मात्र, नवीन पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2026 | 03:08 PM
बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच (फोटो सौजन्य-Gemini)

बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शीतलकुमार शिंदे, धाराशिव : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या बेंबळी (ता. धाराशिव) येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पुढे आला आहे. तब्बल १ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने सुमारे २५ हजार लोकसंख्येचे बेंबळी गाव आजही पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे.

रुईभर प्रकल्पातून पाणी; तरीही टंचाई कायम

बेंबळी गावापासून सुमारे ९ ते १० किमी अंतरावर असलेल्या रुईभर मध्यम प्रकल्पातून या गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. पूर्वीची योजना दुरुस्त करून “हर घर जल” उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जल जीवन मिशनअंतर्गत नव्याने कामे करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ९६.५० लाख रुपये असा एकूण १.९३ कोटींचा निधी मंजूर करून खर्चही दर्शविण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात जुन्याच पाईपलाईनला रंगरंगोटी करून नवीन पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, वारंवार पाईपलाईन फुटणे, गळती होणे आणि दुरुस्ती करणे हे रोजचेच झाले असून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

Konkan चा ‘वणवा’ विधानसभेत; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार निकमांची मागणी

कमी क्षमतेचे विद्युतपंप बसविल्याचा आरोप

योजनेत तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष झाल्याचाही आरोप आहे. ज्या ठिकाणी ५० ते ७५ अश्वशक्तीचे विद्युतपंप आवश्यक होते, त्या पंपगृह फिल्टर व पंपगृहावर अनुक्रमे केवळ १२ व १५ अश्वशक्तीचे पंप बसविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे योजना पूर्ण क्षमतेने राबविणे शक्य नसल्याने पाणीपुरवठा खंडित होत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे.

नळ असूनही पाणी नाही; टँकरवर अवलंबून गाव

घराघरांत नळजोडणी देण्यात आली असली तरी महिनोन्‌महिने नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा ग्रामीण पातळीवरील अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारामुळे बोजवारा उडाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कमी दरात निविदा; निकृष्ट कामाचा आरोप

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील हणमंत वसंत जाधव या ठेकेदाराने सुमारे दोन कोटींच्या अंदाजित कामासाठी १.५८ कोटी रुपयांची कमी दरातील निविदा भरली होती. मात्र, काम निकृष्ट व केवळ कागदोपत्री झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

कायदेशीर बाबी काय सांगतात?

जल जीवन मिशन अंतर्गत कामे निश्चित तांत्रिक मानकांनुसार करणे बंधनकारक आहे. शासन निधीचा अपहार झाल्यास भारतीय दंड संहिता कलम ४०९ (विश्वासघात), ४२० (फसवणूक) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. काम निकृष्ट असल्यास महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली व निविदा अटींनुसार ठेकेदारावर दंडात्मक कारवाई, ब्लॅकलिस्टिंग व रकमेची वसुली केली जाऊ शकते. तांत्रिक मानके न पाळल्यास संबंधित अभियंता व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी होऊ शकते.

अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगितले की, “पूर्वीची योजना बेंबळीसह अन्य दोन गावांसाठी होती. सध्या ही योजना केवळ बेंबळीपुरती मर्यादित आहे. सर्व तांत्रिक बाबी अधीक्षक अभियंता स्तरावर अंतिम केल्या जातात. आदेशानुसार काम करण्यात आले आहे. जुन्या पाईपलाईन वापरल्याचे आढळल्यास तपास करून योग्य कारवाई करण्यात येईल.” शासन स्तरावर या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यानेही हे काम रखडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चौकशीची मागणी तीव्र

दरम्यान, बेंबळीतील नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण (ऑडिट) करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील इतर गावांतील जल जीवन मिशन योजनांचाही सखोल आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. गाव तहानलेले असताना कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च दाखविण्यात आल्याचा आरोप गंभीर असून, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

Web Title: Embelee water life mission faces embezzlement of two crores poor work leaves the village still thirsty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला
1

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…
2

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण
3

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता
4

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Feb 26, 2026 | 04:29 PM
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Feb 26, 2026 | 04:08 PM
Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Feb 26, 2026 | 03:56 PM
Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Feb 26, 2026 | 03:55 PM
माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

Feb 26, 2026 | 03:50 PM
Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Feb 26, 2026 | 03:50 PM
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

Feb 26, 2026 | 03:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.