Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी विद्यार्थ्यांना दप्तरे आणि शालेय साहित्य न मिळाल्याने स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 10:08 PM
शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

Follow Us
Follow Us:

मुंबई : शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अद्याप दप्तर आणि इतर २७ प्रकारच्या शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. या विलंबावरून गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ‘शाळा सुरू होऊनही वस्तू मिळत नसतील, तर गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे? प्रशासनाने दप्तराची लक्तरं वेशीवर टांगली आहेत’, अशा अत्यंत तिखट शब्दांत सदस्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. कंत्राटदाराची निवड, विलंबाचे कारण आणि वस्तूंची गुणवत्ता या मुद्द्यांवरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले होते.

चर्चेची सुरुवात करताना शिवसेना (ठाकरे गट) सदस्या मीनाक्षी पाटणकर यांनी शालेय वस्तूंच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी प्रशासनाला घेरताना विचारले की, शालेय वस्तू वेळेत मिळतील असा गाजावाजा करण्यात आला होता, मग त्याचे काय झाले? या कामात १० कंत्राटदार बाद का झाले आणि ज्या कंत्राटदाराला काम दिले आहे, त्याला भूतकाळात दंड झाला असताना वस्तूंची गुणवत्ता कशी राखली जाईल ? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

“गोदामांमध्ये पडून असलेली दप्तरे ताब्यात घ्या…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. सईदा खान आणि ठाकरे गटाच्या लक्ष्मी भाटिया यांनी वस्तूंच्या गुणवत्तेवर आणि कंत्राटदारावर गंभीर आरोप केले. नव्या ठेकेदाराची नेमणूक झालेली असतानाही जुन्याच वस्तू विद्यार्थ्यांना दिल्या जाण्याची भीती व्यक्त करत पालिकेच्या गोदामांमध्ये पडून असलेली जुनी दप्तरे प्रशासनाने तातडीने ताब्यात घ्यावीत, अशी मागणी डॉ. खान यांनी केली. काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी संतापून थेट वाटप कार्यक्रमांवरच बहिष्कार टाकल्याचे सांगितले.

खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी; बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला

अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे मोठे भाष्य

यावर भाष्य करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, “ज्या ठेकेदारांनी नमुने सादर केले नाहीत, त्यांनाच प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, सध्या पात्र ठेकेदारांकडून वस्तूंचा पुरवठा सुरू असून येत्या काही दिवसात तो पूर्ण होईल. सर्व शालेय वस्तूंची आणि दप्तरांची ‘लॅब टेस्टिंग’ झाली असून विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार काळजी घेऊन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स तयार करण्यात आल्या आहेत, ‘जेम’ पोर्टलमुळे उशीर झालेला नसून हा प्रक्रियेचाच एक भाग आहे, तरीही पुढील वर्षी सर्व वस्तू वेळेत दिल्या जातील.”

“कंत्राटदाराला थेट काळ्या यादीत टाकाले जावे…”

जून महिना संपत आला तरी शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत; पालिकेने मोफत वस्तूंची सवय लावल्याने पालकांनी स्वतः सोय केली नाही आणि आज पालिका त्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे उशीर करणाऱ्या कंत्राटदाराला थेट काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणी मिरांडा यांनी केली. पुढे बोलताना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांनी या विलंबासाठी ‘जेम’ पोर्टल कारणीभूत असल्याचा आरोप केला. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी मुलांचा गोंधळ उडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या वजनाची आणि रंगांची दप्तरे देण्याची मागणी केली.

विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा

Web Title: Bmc school bags delay opposition targets contractor marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • BMC
  • bmc school
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
1

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
2

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
3

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक
4

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.