देशभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी नोकरीच्या शोधत असतात. तुमच जर पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल नाही. तरी तुम्हाला चिंता करायच गरज नाही. कारण तुमच १० वी आणि १२ किवा इतर विषयात डिप्लोमा आणि आयटी आय झाला असेल तर तुम्हाला नोकरीसाठी अप्लाय करता येईल. सीसीएलने अधिकृत नोटिफिकेशन जारी केल आहे . ज्यात तुम्हाला आता काम करण्याची संधी मिळू शकते.
या सीसीएलमध्ये ११८०पदांवर जागा निघाल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिस करता येईल .३ ऑक्टोबर २०२५ अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे .२४ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे .centralcoalfeilds.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल .यामध्ये फ्रेशर अप्रेंटिस ६२ पदे, ग्रॅज्युएट अप्रेंटिस २०८ पदे, टेक्निशियन अप्रेंटिस ३८० पदे या पदांवर भरती होणार आहे. ज्या विद्यार्थ्याच वय १८ वर्ष आणि ३२ वर्षापर्यंत यासाठी अप्लाई करता येणार आहे. ७ हजार ते ९ हजारापर्यंत मिळणार स्टायपेंड तर तीन टप्प्यात याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल
ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तीन टप्प्यात ही प्रक्रिया करावी लागेल. ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केल जाईल .त्यांचं कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.मेडिकल चेक अप केल जाईल. त्यांची जर प्रक्रिया तुम्ही वेळेत पार पाडली तर तुम्हाला यात काम करण्याची संधी मिळू शकेल. दरवर्षी या मध्ये जागांची घोषणा केली जाते. यंदा पण ११८० जागा आहेत आणि अप्रेंटिसवर आपल्याला काम करता येईल. सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडकडून याची घोषणा करण्यात आली आहे. दिलेल्या वेबसाईटवर जाऊन करा नोकरीसाठी अर्ज तुम्ही जर अप्लाय करत असाल तर वेबसाईटवर जाऊन नियमावली वाचा.
कशी कराल नोंदणी
आधी तुम्हाला अप्रेंटिस पोर्टल NAPS आणि NATS या पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करावं लागेल.
त्या नंतर तुम्हाला Centralcoalfeilds.in या वेबसाईटवर जावं लागेल.
होम पेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्हांला फॉर्म सेक्शन येईल.
त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता.
आरआरबी एनटीपीसी सीबीटी 1चा निकाल लवकरच
आरआरबी एनटीपीसी पदवीधर पातळी सीबीटी १ ची परीक्षा ५ जून ते २४ जून २०२५च्या दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी नवीनतम अपडेटसाठी अधिकृत वेबसाईट तपासावी.