फोटो सौजन्य - Social Media
हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे, फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स (PCM) विषय शिकलेला असणे आणि इंग्रजीचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. वय १७ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणारे विद्यार्थीच या कोर्सला अर्ज करू शकतात. प्रवेश प्रामुख्याने JEE Main आणि JEE Advanced या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांद्वारे मिळतो, तर WBJEE, VITEEE, KEAM आणि SRMJEEE यांसारख्या राज्य आणि विद्यापीठस्तरावरील परीक्षा देखील उपलब्ध आहेत. काही प्रतिष्ठित संस्थांकडून स्वतंत्र प्रवेश परिक्षाही घेतल्या जातात.
या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, मशीन डिझाईन, क्वालिटी कंट्रोल, प्रॉडक्शन प्लॅनिंग, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स, मटेरियल सायन्स, तसेच CAD/CAM यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा अभ्यास करायला मिळतो. उद्योगभेटी, वर्कशॉप प्रॅक्टिकल्स आणि प्रोजेक्ट वर्कद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचा अनुभव मिळतो, जे त्यांच्या भविष्यातील व्यावसायिक करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. देशातील NIT त्रिची, NIT कालिकत, JNTU हैदराबाद, NIT आगरतळा, वोक्सन विद्यापीठ, BIT रांची, ग्रेटर नोएडा इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, BML मुंजाल युनिव्हर्सिटी, कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी आणि UEM कोलकाता या संस्था प्रॉडक्शन इंजिनिअरिंगसाठी सर्वोत्तम मानल्या जातात.
योग्य कौशल्ये, तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक समज असल्यास उत्पादन क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध असून देश-विदेशातील मोठ्या उद्योगसमूहांमध्ये उत्कृष्ट करिअर करता येते. म्हणूनच, नवीन वस्तू समजून घेण्याची, तयार करण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग हे उज्ज्वल भविष्यासाठीचे एक उत्तम आणि स्थिर निवड ठरते.






