Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : विद्यार्थ्यांना ‘अर्थसंकल्प २०२६’चे ज्ञान तेही सोप्या भाषेत! कोल्हेटकर महाविद्यालयाचा उपक्रम

Shripad Krishna Kolhatkar Mahavidyalaya येथे ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ या विषयावर विशेष व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 14, 2026 | 06:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पातील क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत समजाव्यात आणि देशाच्या आर्थिक धोरणाची स्पष्ट कल्पना मिळावी या उद्देशाने स्थानिक Shripad Krishna Kolhatkar Mahavidyalaya येथे ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ या विषयावर विशेष व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Weather : पारा ४० पार…! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि Gadge Baba यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाच्या उद्देशाबाबत माहिती देत वाणिज्य विभागप्रमुख डॉ. ऋषिकेश विप्रदास यांनी प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावहारिक जीवनात अर्थसंकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील बदल समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाचा अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून G. S. College येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. आर. गव्हाळे तसेच SPM College येथील प्रा. डॉ. दिलीप महाजन उपस्थित होते. दोन्ही तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांसमोर ‘अर्थसंकल्प-२०२६’मधील महत्त्वाच्या बाबींचे सविस्तर विश्लेषण केले. अर्थसंकल्पातील तांत्रिक मुद्दे, नवीन कररचना, आर्थिक धोरणे आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होणारा परिणाम या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रा. डॉ. गव्हाळे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून तो देशाच्या विकासाचा आराखडा असतो. सरकार कोणत्या क्षेत्राला किती प्राधान्य देत आहे, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवली जात आहे आणि नागरिकांसाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, याची दिशा अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करून देशाच्या आर्थिक घडामोडी समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. दिलीप महाजन यांनीही आपल्या मार्गदर्शनात चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. विशेषतः कररचनेत झालेले बदल, उद्योग-व्यवसाय क्षेत्रावर होणारा परिणाम तसेच सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारे सकारात्मक व नकारात्मक परिणाम त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. अर्थसंकल्पाचा परिणाम शेती, उद्योग, शिक्षण आणि रोजगार या सर्व क्षेत्रांवर होत असल्यामुळे त्याचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता देशातील आर्थिक घडामोडींची माहिती घेतली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी तसेच डॉ. ऋषिकेश विप्रदास यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद बावस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनय उमरकर यांनी केले.

Hingoli Politics: भाजपचा हिंगोली पॅटर्न: ‘इनकमिंग’ नेत्यांच्या पुनर्वसनाचा पेच सुटणार? निष्ठावंत विरुद्ध आयात संघर्षाची चर्चा

या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सचिन उनडंकार, प्रा. विठोबा देठे, प्रा. नीलिमा भोपळे, प्रा. आकाश निलजे, गजानन वानखेडे, हर्षद धर्मे आणि योगेश तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांचे सखोल आकलन झाले असून त्यांना अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाची नवी दिशा मिळाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Web Title: Buldhana news students gain insights into budget 2026explained in simple language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.