Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : जि. प.चा ४१ कोटींचा अर्थसंकल्प! सीईओ खरात यांची मंजुरी; वाढीव अर्थसंकल्प केला सादर

बुलढाणा जिल्हा परिषदेचा २०२६-२७ साठी ४१.२३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. सीईओ गुलाबराव खरात यांनी मंजुरी दिली असून प्रकाश राठोड यांनी तो सादर केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 26, 2026 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ साठी ४१ कोटी २३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सामान्य सभेत मंजूर करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या अर्थसंकल्पास मंजुरी दिली असून, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनी तो सादर केला. यावेळी जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा अर्थसंकल्प मुद्रांक शुल्क अनुदान, जमीन महसूल अनुदान, गुंतवणुकीवरील व्याज आणि इतर उत्पन्नाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. गुंतवणुकीवरील व्याजात वाढ झाल्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प वाढीव ठरला आहे.

निसर्ग ‘राजा’वर कोपला; हापूस उत्पादनात ९० टक्के घट, तापमानातील अस्थिरतेचा फटका

या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. ‘सीईओ संग्राम योजना’ अंतर्गत १०० संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी ५१ लाख रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ‘मिशन झेडईडीडी’ अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली असून, १०० विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी कोचिंगची सुविधा दिली जाणार आहे. तसेच विधवा, परित्यक्ता आणि एकल महिलांसाठी ५० लाखांचे सहाय्य अनुदान देण्यात येणार असून सुमारे १००० महिलांना त्याचा लाभ होणार आहे.

ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी बायोगॅस योजनेसाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा लाभ १३ तालुक्यांतील सुमारे १३० लाभार्थ्यांना होणार आहे. याशिवाय २९३ अर्थवेतन स्त्री परिचारिकांसाठी गणवेश व भाऊबीज भेटीसाठी ६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शासन नियमांनुसार समाज कल्याणासाठी २० टक्के, महिला व बाल कल्याणासाठी १० टक्के, देखभाल-दुरुस्ती २० टक्के, दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के, शाळा दुरुस्ती ५ टक्के, समृद्ध पंचायत अभियानासाठी १० टक्के आणि ई-गव्हर्नन्ससाठी ०.५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. दिव्यांग कल्याणासाठी ८५ लाख आणि मागील अनुशेषासाठी २.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Railway News : प्रवाशांना लुटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा दणका; 121 जणांवर दंडात्मक कारवाई

विभागनिहाय निधीमध्ये बांधकाम विभागासाठी ६.७३ कोटी, शिक्षणासाठी ३.५८ कोटी, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी ४.०५ कोटी, पंचायत विभागासाठी ४.३१ कोटी, सामान्य प्रशासनासाठी २.९० कोटी, समाज कल्याणासाठी २.०६ कोटी, महिला व बाल कल्याणासाठी १.१२ कोटी, लघु पाटबंधारेसाठी १.८१ कोटी, कृषीसाठी ८१ लाख, पशुसंवर्धनासाठी ६४ लाख, सार्वजनिक आरोग्यासाठी ५९ लाख आणि वित्त विभागासाठी ७१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राजमाता जिजाऊ जयंती, संत चोखामेळा जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा आणि सैलानी यात्रा यांसारख्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे. एकूणच, या अर्थसंकल्पाद्वारे ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यांना गती देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Buldhana news zilla parishads 41 crore budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
1

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली
2

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
3

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा
4

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.