फोटो सौजन्य - Social Media
सीए फाउंडेशन आणि इंटरमिडीएट परीक्षांच्या वेळेपत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे सदर वेळापत्रकाची दिनांक त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली गेली आहे. विद्यार्थ्यंना हे वेळापत्रक इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट icai.org वर जाऊन डाउनलोड करता येणारे आहे. परीक्षेसंदर्भात सगळी माहिती इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या ऑफिसिअल वेब साईटवर पाहता येणार आहे. प्रदर्शित वेळापत्रकानुसार, सीए फाउंडेशन तसेच इंटरमिडीएट परीक्षा दोन ग्रुपमध्ये विभागले गेली आहे. दोन्ही ग्रुपची परीक्षा वेगवेगळ्या तारखेला होणार आहे. सीए फाउंडेशन तसेच इंटरमिडीएट परीक्षा ग्रुप १ ची परीक्षा १ नोव्हेंबर २०२४, ३ नोव्हेंबर २०२४ तसेच ५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली असून ग्रुप २ ची परीक्षा नोव्हेंबर २०२४ च्या ७, ९ आणि ११ तारखेला आयोजित करण्यात आली आहे. शासनाने आश्वासन दिले आहे कि परीक्षेच्या वेळापत्रकात भविष्यात कोणतेही बदल केले जाणार नाही.
वेळापत्रक डाउनलोड कसे करावे?
सर्वप्रथम इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट icai.org वर जा.
इम्पॉर्टन्ट अनाऊन्समेन्टच्या लिंकवर क्लिक करून नवीन फोल्डर ओपन होईल.
येथे इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडिया सीए नोव्हेंबर परीक्षा २०२४ वर क्लिक करा.
एक PDF समोर येईल यात वेळापत्रक पाहता येईल.
वेळापत्रक डिवाइसमध्ये सेव करण्यासाठी PDF डाउनलोड करा.
अशा प्रकारे सीए फाउंडेशन आणि इंटरमिडीएट परीक्षेचा वेळापत्रक इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अधिकृत वेब साईटवर पाहता येणार आहे. तसेच परीक्षेसंबंधित इतर माहिती इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडियाची अधिकृत साईट icai.org वर मिळेल.






