Middle East War : खामेनेई अंडरग्राउंड? इस्रायली हल्ल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ठावठिकाणा गुलदस्त्यात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गुप्तचर हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणची (Iran) राजधानी तेहरानवरील हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेईंना सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. इस्रायलने इराणवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईने मध्यपूर्व हादरले आहे.
पहिला हल्ला हा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मुख्यालयाजवळ करण्यात आला होता. यामुळे खामेनी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना रिव्होल्यूशनरी गार्ड्सने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. खामेनींची सुरक्षा कडत करण्यात आली असून त्यांच्या ठावठिकाणाबद्दल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
इस्रायलच्या तेहरानवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धाची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी इराणमध्ये मेजर कॉम्बॅट ऑपरेशन सुरु केले असल्याचे म्हटले आहे. भविष्यात इराणच्या अणु कार्यक्रमामुळे अमेरिकेला निर्माण होणार धोका टाळण्यासाठी हे युद्ध पुकारले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तसेच त्यांनी खामेनेईंना संपवून टाकण्याचाही इशारा दिला आहे. याशिवाय इराणच्या नागरिकांना तुमच्या स्वतंत्र्याची वेळी आली असल्याचे म्हटले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये अणु कार्यक्रमावरुन वाद सुरु होता. दोन्ही देशांतील न्यूक्लियर चर्चेत देखील ठोस निकाल लागलेला नाही. यावेळी ट्रम्प यांनी अनेक वेळा खामेनेईंची सत्ता संपुष्टात आणण्याचे, त्यांचा खात्मा करण्याच्या हेतूने अनेक खळबळजनक विधाने केली होती.
तसेच खामेनेई देखील गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिकरित्या दिसले नाहीत. सध्याचा खामेनेईंच्या कार्यलयाजवळील इस्रायलचा हल्ला आणि ट्रम्प यांची धमकी पाहता खरेच त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला जात आहे. इराणने देखील या हल्ल्याचा भयावह बदला घेण्याचे म्हटले आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या राजधानी तेहरावरील हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना सुरक्षिक ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या ठावठिकाणाची माहिती केवळ काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच आहे.
Ans: इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर दाखल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा इस्रायलच्या दिशेने केला आहे. तसेच अमेरिकेच्या लष्करी तळांवर देखील हल्ला केला आहे.






