पुण्यातून चार आंतरराष्ट्रीय विमाणे रद्द (फोटो- istockphoto)
पुण्यातून चार आंतरराष्ट्रीय विमाने रद्द
मध्यपूर्व भागात जाणारी विमाने रद्द
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा भीषण हल्ला
पुणे: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबी, दुबईसाठी जाणारी चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे शनिवारी (दि. २८) रोजी रद्द करण्यात आली. त्यामुळे पुण्याहून दुबई, (Iran vs Israel War) अबुधाबी जाणाऱ्या प्रवाशांची नियोजित कामे रखडली. अचानक तणावपूर्ण परिस्थितीमुळे पुण्यासह संपूर्ण देशभरातून मध्यपुर्व भागात जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत.
त्यामुळे शनिवारी पुण्यातून होणाऱ्या अबुधाबी आणि दुबई भागात होणारी चार विमाने रद्द करण्यात आली. यात स्पाईस जेट कंपनीचे (फ्लाईट क्रमांक -एसजी 51) पुणे ते दुबई, रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी होणारे उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच, एअर इंडिया एक्सप्रेसचे (फ्लाईट क्र. आयएक्स २८३) पुणे ते अबू धाबी, रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी होणाऱ्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. याशिवाय इंडिगो (फ्लाईट क्र. 6ई 1484/1483 दुबई-पुणे-दुबई, रात्री १०.३० वाजता येणारे आणि १ मार्च रोजी पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी दुबईकडे जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विमान कंपन्यांनी या बदलाबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना दिली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना तिकीट परतावा किंवा युध्दजन्य स्थिती संपल्यानंतरच्या पुढील तारखांचे पर्यायी उड्डाणांचे पर्याय दिले जात आहेत.
भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाची ठिणगी उडाली आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेरहानसह ३० ठिकाणांवर हल्ला केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे. इराणने देखील इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीव आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
World War 3: लहान लेकरांना सोडलं नाही; Iran सोबत जग संपणार? Airstrike मध्ये 51 जणांचा मृत्यू
इस्रायलमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्वे
भारतीय दूतावासाने इस्रायलमधील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्वांमध्ये भारतीय नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारतीय नागरिकांना २४ तास सतर्क राहण्यास सांगण्यता आले आहे. मध्यपूर्वेत परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तसेच पूढली सुचना मिळेपर्यंत प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.






