Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Free Online Courses: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! सीबीएसईने सुरू केले ‘हे’ मोफत ऑनलाईन कोर्सेस; पालकही घेऊ शकतात प्रवेश

CBSE Free Online Courses 2026: सीबीएसई (CBSE) आणि NIELIT ने मिळून ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ मोफत ऑनलाईन कोर्सेस सुरू केले आहेत. एआय, कोडिंग आणि वेब डिझायनिंग शिकण्यासाठी 'ndu.digital' वर रजिस्ट्रेशन करू शकता.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 13, 2026 | 03:18 PM
online course

online course

Follow Us
Follow Us:

CBSE Free Online Courses 2026: आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाली आहे. आता बदल घडण्यासाठी वर्षांचा काळ लागत नाही, तर महिने किंवा आठवड्यांच्या वेगाने बदल पाहायला मिळत आहेत. स्वतःला आजच्या काळाशी सुसंगत ठेवण्यासाठी अप-टू-डेट राहणे अत्यंत आवश्यक आहे. यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर काम करणे. आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी किंवा व्यवसायात नफा मिळवण्याच्या दृष्टीने नवीन कौशल्ये शिकणे खूप गरजेचे बनत चालले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन तंत्रज्ञानाच्या या युगात स्पर्धा अत्यंत उच्च पातळीवर आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलांना योग्य दिशा आणि तंत्रज्ञान शिकवणे अत्यंत आवश्यक आहे.

या संदर्भात ‘सीबीएसई’कडूनही (CBSE) एक उत्तम संधी दिली जात आहे. आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल ठेवण्यासाठी केवळ शाळेतील पुस्तकी अभ्यासच नाही, तर अतिरिक्त वेळ देऊन इतर कोर्सेस देखील शिकवले पाहिजेत.

सीबीएसईचे १९ ऑनलाईन कोर्सेस सुरू

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (NIELIT) डिजिटल युनिव्हर्सिटीने एकत्रितपणे १९ ऑनलाईन कोर्सेस सुरू केले आहेत. हे सर्व कोर्सेस पूर्णपणे मोफत असून विद्यार्थी आपल्या वेळेनुसार घरी बसून हे शिकू शकतात. या १९ कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये शिकण्याची संधी मिळू शकते. विशेष बाब म्हणजे हे कोर्सेस करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस सुरू

सीबीएसईने हे मोफत कोर्सेस इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. विद्यार्थी दररोज शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त नवीन तंत्रज्ञानाबद्दल मोफत शिकू शकतात. एनडीयू (NDU) पोर्टलवर हे सर्व १९ ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध होतील, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आजच्या उद्योगांशी आणि रोजगाराशी संबंधित माहिती मिळवता येईल. हे पोर्टल विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंतचे  कोर्सेस मोफत शिकण्याची संधी देत आहे.

Study in India: भारताच्या उच्च शिक्षणाची जगात क्रेझ! ‘या’ राज्याला मिळतीये विद्यार्थ्यांची पहिली पसंती

कोर्सेसमध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे?

ऑनलाईन कोर्सेसमध्ये एआयच्या कोर्सेसचा समावेश आहे, ज्यामध्ये जनरेटिव्ह एआय पासून ते ‘युवा एआय फॉर ऑल’ प्रोग्रामचा समावेश आहे. तसेच या पोर्टलवर वेब डिझायनिंगबद्दल शिकवले जाईल. याशिवाय एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, चिपक्राफ्ट आणि ३डी प्रिंटिंग इत्यादी गोष्टी विद्यार्थी शिकू शकतात. विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या काळातील सर्वात ट्रेंडिंग कोर्सेसपैकी एक असलेला पायथन लँग्वेजचाही यात समावेश केला आहे. याशिवाय कॉम्प्युटर कॉन्सेप्ट्सशी संबंधित कोर्सेसही येथे शिकता येतील. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सायबर सिक्युरिटी आणि क्लाउड कम्प्युटिंगबद्दल शिकवले जाईल. तसेच आयपी इंटिग्रेशन, एसओसी साइनऑफ, सेमीकंडक्टर डिझाईन आणि आरटीएलशी संबंधित कौशल्ये विद्यार्थी शिकू शकतात.

ONGC Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! दरमहा मिळणार ७० हजारांपेक्षा जास्त पगार

या कोर्सेससाठी प्रवेश कसा मिळवावा?

या कोर्सला केवळ शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थीच नव्हे तर पालकही या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. यावर प्रवेश करण्यासाठी पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी एनआयईएलआयटी (NIELIT) डिजिटल युनिव्हर्सिटी NDU च्या अधिकृत वेबसाइट ndu.digital वर जावे लागेल. तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करून तुम्ही तुमच्या आवडीचा कोर्स निवडू शकता. या डिजिटल लर्निंग कोर्सेससाठी कोणतीही वेळेची मर्यादा नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आवडीचा कोर्स शिकू शकता.

Web Title: Cbse nielit free online courses python ai coding registration process ndu portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • ai
  • CBSE
  • course
  • Online Classes

संबंधित बातम्या

बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!
1

बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!

National Entrepreneurship Networkच्या अध्यक्षपदी मनीष दलाल; AI, SaaS आणि Cloud क्षेत्रातील 25 वर्षांच्या अनुभवाचा फायदा
2

National Entrepreneurship Networkच्या अध्यक्षपदी मनीष दलाल; AI, SaaS आणि Cloud क्षेत्रातील 25 वर्षांच्या अनुभवाचा फायदा

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!
3

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..
4

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.