फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल इंडस्ट्रिअल सेक्युरिटी फोर्स (CISF)ने काही दिवसांपूर्वी भरतीला सुरुवात केली होती. या भरतीचा उद्देश फायरमनची रिक्त जागा भरणे असे होते. ११३० रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या बंपर भरतीमध्ये उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज नोंदवला आहे. फायरमन पदासाठी इच्छुक असणाऱ्या तसेच अधिसूचनेमध्ये नमूद सर्व अटी शर्तीना पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. मुळात, नियुक्तीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच कधी प्रवेश पत्र जाहीर केले जाईल? या गोष्टींचे उत्तरे समोर आली आहेत.
तर नियुक्तीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून उमेदवारांना फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट (PET), फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) या दोन्ही परीक्षांना उत्तीर्ण करावे लागणार आहे. तसेच यानंतर उमेदवारांना दस्तऐवजांची पडताळणीसाठी यावे लागणार आहे. लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर PET आणि PST परीक्षा २४ डिसेंबर २०२४ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येईल. अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच अर्ज कर्त्या उमेदवारांना प्रवेश पत्र जाहीर करण्याची तारीख सांगण्यात आले आहे. प्रवेशपत्र १६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर केले जाईल. या दिवशी अर्ज कर्त्या उमेदवारांनात्यांचे प्रवेश पत्र पाहता येईल.
मुळात, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. किमान १८ वर्ष आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २३ निश्चित करण्यात आली होती. तसेच आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. तसेच अधिसूचनेमध्ये शैक्षणिक अट नमूद आहे. कॉन्स्टेबलच्या पदासाठी अर्ज करता उमेदवार विज्ञान क्षेत्रातून १२ वी उत्तीर्ण हवा. एकंदरीत, ३० सप्टेंबर २०२४ या तारखेच्या आतमध्ये HSC उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ३१ ऑगस्टपासून करण्यात आली होती. तर उमेदवारांनी ३० सप्टेंबरपर्यंत अर्जाची नोंदणी केली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.