प्रत्येक घासत मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही आवडीने खाल्ले जाते. दही खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. दह्याच्या सेवनामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो. दही, ताक इत्यादी पदार्थांमध्ये असलेले प्रोबायोटिक आतड्यांमध्ये चांगले विषाणू तयार करतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही किंवा ग्लासभर ताक प्यावे. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि मोठ्या आतड्यांमध्येब अन्नपदार्थ जाऊन पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाही. दुपारच्या जेवणात कायमच डाळभात किंवा आमटी भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी १० मिनिटांमध्ये झटपट तुम्ही काकडी गाजर घालून दहीभात बनवू शकता. दहीभात सहज पचन होतो. जास्त वेळ लागत नाही. याशिवाय दहीभात खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. दुपारच्या जेवणात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही दहीभात बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया दहीभात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? मग मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी






