फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CoBRA Commando New Chief: केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अत्यंत अत्यंत खडतर आणि एलिट मानल्या जाणाऱ्या ‘कोब्रा’ (CoBRA – Commando Battalion for Resolute Action) कमांडो युनिटच्या महानिरीक्षक पदी आयपीएस संजुक्ता पराशर (IPS Sanjukta Parashar) यांची निवड करण्यात आली आहे. कोब्रा युनिटची कमान सांभाळणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
असमच्या घन्या जंगलात AK-47 हातात घेऊन दहशतवाद्यांविरुद्ध प्रत्यक्ष मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या संजुक्ता पराशर यांना ‘असमची आयरन लेडी’ (Iron Lady of Assam) म्हणून ओळखले जाते.
शिक्षण: दिल्ली विद्यापीठाच्या ‘इंद्रप्रस्थ कॉलेज’मधून राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी JNU मधून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टर्स, एम.फिल आणि PhD पूर्ण केली.
UPSC यश: २००६ च्या नागरी सेवा परीक्षेत त्यांनी ८५ वा ऑल इंडिया रँक (AIR 85) मिळवला. उत्तम रँकमुळे त्या IAS होऊ शकत होत्या, परंतु देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी IPS कॅडर निवडले.
पहिली पोस्टिंग आणि संघर्ष: २००८ मध्ये सहाय्यक कमांडंट म्हणून रुजू झाल्यानंतर लगेचच उडालगुडी येथे बोडो आणि इतर गटांमधील हिंसाचार रोखण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
एनकाऊंटर स्पेशालिस्ट: सोणितपूर येथे SP असताना अवघ्या १५ महिन्यांत बोडो उग्रवाद्यांविरुद्ध धडक कारवाई करत १६ उग्रवाद्यांना टिपले आणि ६४ हून अधिक उग्रवाद्यांना अटक केली.
NIA मधील सेवा: त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेत (NIA) पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून दहशतवादविरोधी अनेक महत्त्वाच्या तपास मोहिमांचे नेतृत्व केले आहे.
CoBRA हे सीआरपीएफचे विशेष कमांडो दल असून ते प्रामुख्याने घनदाट जंगलांमधील नक्षलवाद आणि उग्रवादविरोधी ‘गोरिल्ला वॉरफेअर’ (Jungle & Guerrilla Warfare) साठी ओळखले जाते. सध्या मणिपूर आणि नक्षलग्रस्त भागांत तैनात असलेल्या या एलिट तुकडीच्या नेतृत्वाची जबाबदारी आता डॉ. संजुक्ता पराशर यांच्याकडे असेल.
UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!






