Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉड्यूलर सर्व्हे एज्युकेशन २०२५ जाहीर! महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ‘इतका’

देशातील खासगी शालेय शिक्षणावर तब्बल १.७५ लाख कोटी रुपयांचा खर्च होत असून महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ३१.९ हजार रुपये असल्याने तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 05:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • देशातील एकूण नोंदणीपैकी ५५.९ टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकतात
  • प्रति विद्यार्थी खर्चात मोठी असमानता
  • देशातील सरासरी शिक्षण शुल्क ७,१११ रुपये
कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉड्यूलर सर्व्हे एज्युकेशन 2025 नुसार देशातील खासगी शाळांवरील वाढता खर्च चिंतेचा विषय ठरत असून भारतात खासगी शालेय शिक्षणावर तब्बल १.७५ लाख कोटी रुपयांचा भार पडतोय, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एका विद्यार्थ्यावर होणारा वार्षिक खासगी शिक्षणाचा सरासरी खर्च ३१.९ हजार रुपये असून तो देशातील राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे, हे विशेष लक्षवेधी आहे. सरकारी शाळांमध्ये नामांकन वाढत असले तरी खाजगी आणि सरकारी शिक्षणात खर्चाची दरी प्रचंड प्रमाणात वाढताना दिसते. देशातील एकूण नोंदणीपैकी ५५.९ टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकतात; ग्रामीण भागात हा वाटा जवळपास दोन तृतीयांश, तर शहरी भागात ३०.१ टक्के आहे. तथापि, प्रति विद्यार्थी खर्चात मोठी असमानता जाणवते.(Comprehensive Modular Survey Education 2025 announced)

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचा नवा दृष्टिकोन! भविष्यात विद्यापीठ निर्मितीचा विचार केला जाहीर

सरकारी शाळांमध्ये केवळ २,८६३ रुपये तर बिगरसरकारी (खासगी) शाळांमध्ये तब्बल २५,००२ रुपये वार्षिक खर्च होतो, म्हणजेच खासगी शिक्षणाचा खर्च हा सरकारी शिक्षणापेक्षा तब्बल ८.८ पट अधिक आहे. शिक्षण शुल्क हे सर्व प्रकारच्या शाळांमधील सर्वांत मोठे खर्चाचे घटक असून त्यानंतर पाठ्यपुस्तके आणि स्टेशनरी यावर सरासरी २,००२ रुपयांचा खर्च केला जातो. दुसरीकडे, देशातील सुमारे २७ टक्के विद्यार्थी खासगी प्रशिक्षण किंवा कोचिंग घेतात, ज्यात शहरी भागात हा आकडा ३०.७ टक्के आणि ग्रामीण भागात २५.५ टक्के आहे; शहरी कुटुंबे प्रशिक्षणावर प्रति विद्यार्थी ३,९८८ रुपये खर्च करतात. देशातील सरासरी शिक्षण शुल्क ७,१११ रुपये असून त्यात शहरी भागात १५,१४३ रुपये तर ग्रामीण भागात ३,९७९ रुपये इतका लक्षणीय फरक आहे.

सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे शालेय शिक्षणाचा आर्थिक कणा पूर्णपणे कुटुंबांवरच अवलंबून आहे. एकूण ९५ टक्के विद्यार्थ्यांचा शिक्षण खर्च कुटुंबातील सदस्य उचलतात; ग्रामीण भागात हे प्रमाण ९५.३ टक्के असून शहरी भागात ९४.४ टक्के आहे. सरकारी शिष्यवृत्ती किंवा इतर सहाय्याचा शिक्षणातील योगदान अत्यंत नगण्य म्हणजे केवळ १.२ टक्के आहे, ज्यामुळे कुटुंबांवरील शिक्षणाचा आर्थिक बोजा अधिक तीव्रतेने वाढताना दिसतो. राज्यानुसार खासगी शिक्षणावरील वार्षिक खर्चातही मोठे चढउतार आहेत—पंजाबात 43.9 हजार, तामिळनाडूत 44.2 हजार, गुजरातात 38.6 हजार, तेलंगणात 39.1 हजार, तर दादरा नगर हवेली व दमण-दीव येथे हा खर्च सर्वाधिक म्हणजे 56.3 हजार रुपये आहे. महाराष्ट्रात हा आकडा 31.9 हजार असला तरी तो देशातील एकूण सरासरी 28.6 हजार पेक्षा जास्त असल्याने राज्यातील शिक्षणाचा आर्थिक भार अधिक स्पष्टपणे पुढे येतो.

Maharashtra : समायोजन प्रक्रियेला स्थगिती द्या! प्रहार संघटनेची शिक्षणमंत्र्याकडे मागणी

शिक्षणतज्ज्ञांच्या मते, राज्यातील वाढती खासगी शाळांची संख्या, शुल्कातील विविध लपविलेल्या घटकांची वाढ, वाढते कोचिंग कल्चर आणि शहरी भागातील स्पर्धात्मक वातावरण या सर्व घटकांमुळे महाराष्ट्रातील कुटुंबांवर शिक्षणाचा आर्थिक ताण वाढत आहे. अहवालाचा एकूण निष्कर्ष असा की भारतात सार्वजनिक शिक्षणव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असली तरी खासगी शिक्षणाची मागणी, वाढती फी आणि पूरक खर्चामुळे कुटुंबांना जादा खर्चाचा मोठा भार उचलावा लागतो आणि या संरचनेत सुधारणा न झाल्यास भविष्यात आर्थिक असमानता आणखी वाढू शकते.

Web Title: Comprehensive modular survey education 2025 announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • maharashtra
  • Students

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.