फोटो सौजन्य - Social Media
एक्स्पोर्ट क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECGC)ने काही महिन्यनापूर्वी एक भरतीला सुरुवात केली होती. या भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आली होती. या पदासाठी एकूण ४० जागा रिक्त होत्या. या भरती संदर्भांत महत्वाची बातमी आली आहे. ७ नोव्हेंबर २०२४ तारखेला प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज कर्त्या उमेदवारांना प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. तसेच ते पाहता येणार आहे. भारतभर ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या भरतीतून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला १६ लाख रुपये इतके वार्षिक वेतन मिळेल. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे होते. ECGC च्या ecgc.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करायचे होते.
हे देखील वाचा : BIS ने जाहीर केले प्रवेश पत्र; ‘या’ तारखेला सुरु होणार परीक्षा
ECGC ची ही भरती प्रक्रिया सप्टेंबर २०२४ च्या, १४ तारखेपासून आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना ऑक्टोबरच्या १३ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. प्रवेश पत्र ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जाहीर करण्यात येणार असे सांगण्यात आले होते.तसे जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या १६ तारखेला परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे होते. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कात बऱ्यापैकी सूट देण्यात आली आहे. एकंदरीत, सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरायचे होते. तसेच ओबीक आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील ८५० रक्कम अर्ज शुल्काची निश्चित करण्यात आली होती.
अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्काची भरपाई करायची होती. तसेच PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्काची रक्कम १७५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरायचे होते. शैक्षणिक अटी शर्ती उमेदवारांना पात्र करायचे होते. एकंदरीत, अर्ज करता उमेदवार संबंधित क्षेत्रामध्ये पदवीधर असणे अनिवार्य होते. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे होते. किमान २१ वर्षे उमेदवाराची आयु निश्चित करण्यात आली होती. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : उल्हासनगरमधील श्री चैतन्य टेक्नो शाळेने नोंदवला जागतिक विक्रम !
ECGC ने जाहीर केलेल्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये लवकरच नियुक्त प्रक्रिया सुरु होत आहे. एकूण चार टप्प्यांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजली आहे. प्रथम टप्प्यामध्ये लेखी परीक्षा उमेदवारांना पात्र करावी लागणार आहे. नोव्हेंबरच्या १६ तारखेला परीक्षा असून प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना मुलाखत ही उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच दस्तऐवजांच्या पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसह नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. या सर्व टप्प्यांमध्ये पात्र उमेदवारांना नियुक्तीस पात्र होता येणार आहे.