फोटो सौजन्य- प्रतिनिधी
उल्हासनगरच्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलम नवीन जागतिक विक्रम नोंदवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या विक्रमात 3 ते 10 वयोगटातील 10 हजार विद्यार्थ्यांनी गणिताचे किमान 100 ते 600 फॉर्मुला वाचून दाखवले आणि अनोख्या विक्रमाची नोंद केली. यावेळी उपक्रमामध्ये 20 राज्यातील वेगवेगळ्या 120 शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते.
उल्हासनगर येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांच्या वतीने जागतिक विक्रम आयोजित केला होता. त्यांच्या मध्ये समर्पण, नाविन्यपूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी एक ऐतिहासिक हॅट्रिक वर्ल्ड रेकॉर्ड केला. जिथे बहुतेक विद्यार्थी गणिताचे फॉर्मुला पाठ करतात, (किमान 100 आणि कमाल 6OO फॉर्म्युले) जे 3 ते 10 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या गेल्या आहेत. यामध्ये 20 राज्यांमधील 120 शाळा मधील 10,000 विद्यार्थी एकाच वेळी 1000 झूम आयडीद्वारे यामध्ये सामील झाले होते.
अर्शन पगारे, हिरेन वालेचा, रिजुल नायर आणि अर्णवी थोरात यांचे ६०० फॉर्म्युले वाचन
या स्पर्धेत श्री चैतन्य टेक्नो स्कूल उल्हासनगर शाखा मुंबई झोनचे १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. १५ स्पर्धकांपैकी ४ स्पर्धक अर्शन पगारे, हिरेन वालेचा, रिजुल नायर आणि अर्णवी थोरात यांनी ६०० फॉर्म्युले वाचून या सुपर हॅट्रिक वर्ल्डमध्ये आपले कौशल्य पणाला लावत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा कार्यक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस यूके, मॉनिटरेड आणि रेकॉर्डेडच्या अधिकाऱ्यांनी थेट पाहिला आणि एकाच वेळी कामगिरीचे मूल्यांकन केले.
श्री चैतन्य टेक्नो स्कूल्सचा हा चौथा वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट होता. यासाठी संचालक, सीमा भोप्पणा, सुषमा भोप्पणा, श्रीधर, नागेंद्र गरू आणि मुंबई झोनचे जनरल मॅनेजर सुरेंदर राजारिकम, विभागीय समन्वयक मेधा तांदळे, आर. आय. अभिषेक, मुख्याध्यापिका चंद्रकला मौर्य, शिक्षक आणि पालक यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व सहभागींना मनापासून शुभेच्छा दिल्या.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, युके
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, युके ची स्थापना भारतीय वंशांच्या बुद्धिजीवींनी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरणाद्वारे लोकांना प्रतिभा दाखवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केली होती. या संस्थेद्वारे मानवता आणि वैश्विक शांततेसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचाही सन्मान केला जातो त्यांच्याबद्दलची माहिती जतन केली जाते. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट लोकांना विक्रम करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. ही संस्था विक्रम नोंदविण्यासाठी सर्वांना आमंत्रित करत प्रोत्साहन देते. जगातील कोणत्याही भागातील व्यक्तीला त्याचे स्वप्न आणि यश हे त्यांचे विक्रम प्रस्थापित करणारे बनवते. जागतिक वारसा स्थळे देखील “लंडन प्रेस” ब्रिटीश मासिकात सूचीबद्ध, प्रमाणित आणि प्रकाशित केल्या जात आहेत.