
Enthusiastic Response to CET Second Chance PCM-PCB Registration Career News
Educational News : सोनाजी गाढवे : पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी (CET Exam) पीसीएम पीसीबीसमूहाच्या दुसऱ्या संधीच्यासीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाब म्हणून दिनांक १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी विशेष मुदतवाढ देण्यात आली होती.
या दोन दिवसाच्या या विशेष मुदतवाढीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या दोन दिवसातपीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी २४ हजार ९३४विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएमसमूहासाठीच्या सीईटीसाठी १७,९२२ तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ७०१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
या विशेष मुदतवाढीतदुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी असलेल्याया दोन दिवसात एकूण पीसीएम व पीसीबी समूहासाठी २४ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ७ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी प्रथमच पीसीएम व पीसीबीसमूहाच्यादुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी केली आहे, म्हणजे यापूर्वी या विद्यार्थ्यांनी पहिल्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी केली नव्हती. यामध्येपीसीएम समूहासाठी प्रथमच नोंदणी करणारे ४ हजार ६३० विद्यार्थी आहेत. तरपीसीबी समूहासाठीप्रथमचनोंदणी करणारे २ हजार ७९६ विद्यार्थी आहेत.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यासंधीच्या सीईटीसाठी नोंदणी केली होती पण त्यांनी दुसऱ्या सीईटीसाठी नोंदणी केली नव्हती अशा १७ हजार ५०८ विद्यार्थ्यांनीदुसऱ्या सीईटीसाठी नोंदणी केली आहे.यामध्येपीसीएम समूहासाठीदुसऱ्या संधीसाठी नोंदणी करणारे १३ हजार २९२ विद्यार्थी आहेत. तरपीसीबी समूहासाठी दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करणारे ४ हजार २१६ विद्यार्थी आहेत.
हे देखील वाचा : 10 वी आणि 12 वीचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता, संभाव्य तारखा आल्या समोर
मार्च २०२६ मधील मुदतवाढीत ८ हजार ५८० विद्यार्थ्याची नोंदणी
यापूर्वी दिनांक १९ व २० मार्च २०२६ मध्ये पीसीएम व पीसीबी समूहासाठीएक विशेष मुदतवाढ देण्यात आली होती. त्यावेळीपहिल्या व दुसऱ्या संधीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. या दोन दिवसाच्या मुदत वाढीत पहिल्या व दुसऱ्या संधीसाठी ८ हजार ५८० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये पीसीएमसमूहासाठी ५ हजार ४२९ तर पीसीबी समूहासाठी ३ हजर १५१ विद्यार्थ्यांनीनोंदणी केली होती.
दुसऱ्या संधीसाठी ४ लाख २६ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी
दोन दिवसाच्या या विशेष मुदतवाढीमुळे २४ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.यानुसारआजपर्यंत दुसऱ्या संधीसाठी पीसीएम व पीसीबी समूहासाठीच्या सीईटी परीक्षेसाठी एकूण४ लाख २६ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम समूहासाठी ३ लाख १४ हजार ४७५ तर पीसीबी समूहासाठी १ लाख ११ हजार ८०९विद्यार्थ्यांनीनोंदणी केलीआहे.
हे देखील वाचा : स्व-मूल्यमापनासाठी शाळांना देण्यात आली मुदतवाढ; SQAAF अंतर्गत स्व-मूल्यमापन करणे बंधनकारक
सीईटी – दुसऱ्या संधीसाठी नोंदणी