फोटो सौजन्य - Social Media
डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स; ३ वर्षांचा करिअर घडवणारा कोर्स
पॉलिटेक्निक स्तरावर उपलब्ध असलेला डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग हा तीन वर्षांचा तांत्रिक कोर्स असून औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष कामासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. या अभ्यासक्रमात सेन्सर्स, मायक्रो कंट्रोलर्स, रोबोटिक्स, CNC मशीनिंग, ऑटोमेशन सिस्टिम्स, हायड्रॉलिक्स-प्न्यूमॅटिक्स यांसारख्या विषयांचा समावेश असतो. उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रिया स्वयंचलित करण्यापासून ते स्मार्ट उपकरणं विकसित करण्यापर्यंत या क्षेत्रातील अभियंत्यांची गरज सतत वाढत आहे.
पात्रता निकष
या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने दहावीमध्ये किमान 50% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, OBC आणि इतर राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना 5% गुणांची सूट देण्यात येते. दहावीनंतर लगेच तांत्रिक शिक्षणाकडे वळायचं असल्यास हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो.
प्रवेश प्रक्रिया
डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्समध्ये प्रवेशासाठी तीन प्रमुख मार्ग आहेत:
थेट प्रवेश (Direct Admission)
काही पॉलिटेक्निक कॉलेजेस कोणतीही प्रवेश परीक्षा न घेता थेट प्रवेश देतात. उमेदवारांना केवळ अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते.
मेरिट आधारित प्रवेश (Merit List)
अनेक संस्था दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट जाहीर करतात. जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं.
प्रवेश परीक्षा (Entrance Test)
काही विद्यापीठे किंवा राज्य मंडळे प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश देतात. प्रवेश परीक्षा, त्यानंतर समुपदेशन आणि जागांची वाटप प्रक्रिया अशा क्रमाने प्रवेश दिला जातो.
प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जवळपास सर्व ठिकाणी एकसारखीच असते. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी, युजर आयडी-पासवर्ड मिळाल्यानंतर अर्ज भरून फी भरणे. प्रवेश परीक्षा असल्यास प्रथम त्यासाठी वेगळी नोंदणी करावी लागते.
देशातील प्रमुख संस्था
मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा उपलब्ध करून देणाऱ्या काही प्रतिष्ठित पॉलिटेक्निक संस्थांमध्ये पुढील महाविद्यालयांचा समावेश आहे:
मेकॅट्रॉनिक्स अभियंत्यांची मागणी ऑटोमोबाईल, रोबोटिक्स, उत्पादन उद्योग, एरोस्पेस, हेल्थकेअर उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग अशा अनेक क्षेत्रांत सातत्याने वाढत आहे. ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4.0 च्या युगात या क्षेत्रातील करिअर संधी अधिक विस्तारत जाणार आहेत.






